शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायत सत्तेची तयारी सुरू

By admin | Updated: January 21, 2015 23:59 IST

हातकंणगले तालुका : मतदार यादी बनविण्याचे काम सुरू

आयुब मुल्ला - खोची -हातकणंगले तालुक्यातील २१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी गावपातळीवर इच्छुकांच्या तयारीला वेग आला आहे. शासकीय यंत्रणाही निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीने गतिमान झाली आहे. मतदारसंख्या वाढल्याने सदस्य संख्येबरोबर प्रभागातही वाढ झाली आहे. विधानसभा निवडणुकीनंतर आता राजकीय संदर्भ बदलल्याने पक्षापेक्षा आघाड्यांचीच बांधणी करून निवडणुका लढविल्या जातील, असे चित्र आहे. इच्छुकांनी मात्र तयारी सुरू केली आहे, तर आरक्षित जागांसाठी कागदपत्रे गोळा करून दाखले काढण्याची लगबग सुरू आहे.हातकणंगले तालुक्यात सन २०११ च्या जनगणनेनुसार २५ गावांत १ लाखांत ४६ हजार ७५६ इतकी मतदारसंख्या झाली आहे. यातून ९४ प्रभागांची रचना होऊन २६१ सदस्य निवडून द्यावयाचे आहेत. यासाठी २१ ग्रामपंचायतींकरिता जून किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात निवडणुका होण्याची शक्यता आहे. कारण यांची मुदतच आॅगस्टमध्ये संपते. त्यामुळे यापूर्वीच निवडणुका घेणे बंधनकारक आहे. त्याचा विचार करता कार्यकर्त्यांबरोबरच शासकीय यंत्रणाही आपल्या दृष्टीने आवश्यक त्या जोडण्या लावण्यात मग्न झाली आहे. मतदारयादी बनविण्याचे काम सुरू झाले आहे. ती २८ जानेवारीला प्रसिद्ध करावयाची आहे. ५ फेब्रुवारीपर्यंत त्यावर हरकती नोंदवायच्या आहेत. दरम्यान, २८ जानेवारीनंतर प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये मंडल अधिकारी यांच्या उपस्थितीत आरक्षण सोडत होणार आहे. त्यावेळी काही त्रुटी आढळल्यास किंवा वाटल्यास ग्रामस्थांनी आरक्षणासंदर्भात भूमिका मांडता येणार आहे. त्यानंतरच खऱ्या अर्थाने इच्छुकांना आपली प्रचाराची यंत्रणा सर्वार्थाने गतिमान करता येणार आहे. पॅनेल बांधणीची रचनात्मक सुरुवात प्रमुख नेते मंडळींना करणे सोपे होणार आहे.