शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

Corona virus collector kolhapur : संभाव्य पूर टाळण्यासाठी धरणातील पाण्याचे आधीच नियंत्रण : दौलत देसाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 19:37 IST

Corona virus collector kolhapur : पाटबंधारे विभागाने मागील दहा वर्षांचा अभ्यास करून पूर नियंत्रणाबाबतचे नियोजन केले आहे. जिल्ह्यामध्ये दि. २५ ते ३० जुलै आणि दि. ८ ते १२ ऑगस्टदरम्यान पूर येतो. २०१९ ला आलेल्या पुराचा अनुभव पाहता, मागी वर्षी धरणातील पाण्याचे आधीच नियंत्रण केले होते. यावर्षी त्याच पध्दतीने संभाव्य पूर नियंत्रणाचे नियोजन सर्व विभागांच्या समन्वयाने केले असल्याची माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सोमवारी दिली.

ठळक मुद्देसंभाव्य पूर टाळण्यासाठी धरणातील पाण्याचे आधीच नियंत्रण : दौलत देसाई गेल्यावर्षीप्रमाणे सर्व विभागांच्या समन्वयाने नियोजन : जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक

कोल्हापूर : पाटबंधारे विभागाने मागील दहा वर्षांचा अभ्यास करून पूर नियंत्रणाबाबतचे नियोजन केले आहे. जिल्ह्यामध्ये दि. २५ ते ३० जुलै आणि दि. ८ ते १२ ऑगस्टदरम्यान पूर येतो. २०१९ ला आलेल्या पुराचा अनुभव पाहता, मागी वर्षी धरणातील पाण्याचे आधीच नियंत्रण केले होते. यावर्षी त्याच पध्दतीने संभाव्य पूर नियंत्रणाचे नियोजन सर्व विभागांच्या समन्वयाने केले असल्याची माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सोमवारी दिली.जिल्हाधिकारी कार्यालयात मान्सूनपूर्व आढावा बैठक ऑनलाईन झाली. त्यात खासदार धैर्यशील माने, आमदार अरुण लाड, आमदार प्रकाश आवाडे, आमदार राजेश पाटील, आमदार चंद्रकांत जाधव सहभागी झाले. जिल्हा स्तरावरील नियंत्रण कक्षात प्रत्येक विभागाचा एक प्रतिनीधी कार्यरत असतो. सातारा, सांगली येथील पाटबंधारे विभागाच्या संपर्कात याही जिल्ह्याचा विभाग असून, येणाऱ्या आपत्तीपासून सर्वांच्या सहकार्याने जिल्ह्याला नियंत्रित ठेवू, असे जिल्हाधिकारी देसाई यांनी सांगितले.

पाटबंधारे विभागाचे सहायक अधीक्षक अभियंता महेश सुर्वे, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संभाजी माने, महावितरणचे कार्यकारी अभियंता प्रशांत मासाळ यांनी पूर्वतयारीची माहिती दिली. आर. के. पोवार, सर्जेराव पाटील, शिवाजी मोरे, सत्यजित जाधव, अशोक रोकडे, इचलकरंजीच्या नगराध्यक्ष अलका स्वामी, पन्हाळ्याच्या नगराध्यक्ष रूपाली धडेल, ए. बी. पाटील यांनी काही सूचना मांडल्या. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बजरंग पाटील, महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अपर जिल्हाधिकारी किशोर पवार, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे उपस्थित होते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याcollectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूर