शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
4
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
5
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
6
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
7
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
8
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
9
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
10
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?
11
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
12
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
13
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
14
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
15
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
16
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
17
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
18
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
19
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
20
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी

प्रवीणच्या सुवर्णपदकाने वडिलांच्या कष्टाचे चीज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2019 8:50 PM

पुणे येथे सुरू असलेल्या ‘खेलो इंडिया’ स्पर्धेत कुस्तीमध्ये प्रवीण पाटीलने सुवर्णपदक मिळवून शेतमजूर वडिलांच्या कष्टाचे चीज केले. त्याच्या या यशाने कोल्हापूर जिल्ह्याचे नाव देशपातळीवर पोहोचविले.

ठळक मुद्दे‘खेलो इंडिया क्रीडा स्पर्धा; बरेलीत चार-पाच तास सराव

मधुकर डाफळे ।कोल्हापूर : पुणे येथे सुरू असलेल्या ‘खेलो इंडिया’ स्पर्धेत कुस्तीमध्ये प्रवीण पाटीलने सुवर्णपदक मिळवून शेतमजूर वडिलांच्या कष्टाचे चीज केले. त्याच्या या यशाने कोल्हापूर जिल्ह्याचे नाव देशपातळीवर पोहोचविले.कोगे (ता. करवीर) येथील प्रवीणने शाळेबरोबरच कुस्तीचाही श्रीगणेशा एकाचवेळी केला. गावातील हनुमान तालमीत एम. एस. पाटील व विश्वास हरुगले

या वस्तादांच्या मार्गदर्शनाखाली त्याने सरावाला प्रारंभ केला. वडील पांडुरंग पाटील शेतमजूर असूनही त्यांनी प्रवीणच्या खुराक आणि सरावासाठी लागणाऱ्या गोष्टीत कधी खंड पडू दिला नाही.छोट्या चणीच्या चपळ प्रवीणने वडिलांच्या कष्टाला न्याय दिला. त्याने गावागावांतील अनेक मैदाने गाजविली. कुंभी-कासारी कारखान्याच्या मानधनकारक कुस्ती स्पर्धेत २५ किलो वजनी गटात प्रथम क्रमांक पटकाविला. यानंतर त्याने मागे वळून पाहिले नाही. याच स्पर्धेत प्रवीणने ३०, ३५, ४० या गटांत मानधनधारक होण्याचा मान मिळविला.

यानंतर कुस्तीत आवश्यक चपळाई, डावपेच आणि तंत्र आत्मसात करण्यासाठी प्रवीणला पांडुरंगपाटील यांनी पुण्यात जाणता राजा तालीम मंडळाच्या संदीप गोंडवे यांच्याकडे पाठविले. तेथे चार वर्षे सराव करताना प्रवीणने शालेय स्तरावर, तसेच राज्य, राष्ट्रीय स्पर्धा गाजविल्या. उत्कृष्ट कामगिरीच्या बळावर प्रवीणला भारतीय सैन्यदलाच्या ‘आर्मी बाईज’मध्ये स्थान मिळाले. सध्या बरेली आर्मी सेंटर येथे शिलशंकर माऊली हे प्रवीणकडून दररोज चार ते पाच तास सराव करून घेतात. प्रवीणने सब ज्युनिअर कुस्तीस्पर्धेत मागील वर्षी सुवर्णपदक, तर यावर्षी रौप्यपदक पटकाविले आहे. त्याच्या या कामगिरीने सर्वत्र कौतुक होत आहे.पुणे येथे सुरू असलेल्या ‘खेलो इंडिया’ स्पर्धेत ५५ किलो वजनी गटात प्रवीणने महाराष्ट्रालापहिले सुवर्णपदक पटकावून देत मानाचा तुरा खोवला आहे. प्रवीणला रविदादा शिंदे, विकास पोवार यांनी वेळोवेळी अनेक प्रकारची मदत केली आहे. 

आम्ही केलेल्या कष्टाचे प्रवीणने सोने केले. यापुढेही त्याने असे उज्ज्वल यश मिळवावे.- पांडुरंग पाटील, वडील.राज्यासाठी सुवर्णपदक जिंकले ही अभिमानाची बाब असून, यापुढेही त्याने आॅलिम्पिक स्पर्धेत पदक मिळवावे व देशाचे नाव उज्ज्वल करावे.-प्रा. बाजीराव पाटील,सचिव, कोल्हापूर शहर राष्ट्रीय तालीम संघ.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरKhelo Indiaखेलो इंडियाPuneपुणे