शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
2
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच घेतली
3
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
4
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
5
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
6
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
7
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
8
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
9
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
10
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
11
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
12
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
13
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?
14
युक्रेनसाठी सर्वात भयावह रात्र! रशियाने केला सर्वात मोठा ड्रोन हल्ला, अनेक शहरे उद्ध्वस्त
15
99 टक्क्यांहूनही अधिकने घसरून थेट 60 पैशांवर आला होता हा पॉवर शेअर, आता 2857 टक्क्यांची तुफान तेजी!
16
लॉस एंजेलिसमध्ये भडकला हिंसाचार, पत्रकाराला अचानक लागली गोळी; अंगावर शहारा आणणारं दृष्य कॅमेऱ्यात कैद
17
"पतीला मारले, मग माझं अपहरण करून..." सोनमच्या कहाणीनं राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट
18
Mumbai Local Accident: स्वप्नातंल घर घ्यायला बाहेर पडला अन्...; रेल्वे अपघातात आयटी इंजिनिअरचा दुर्दैवी अंत!
19
कमाल झाली! थ्रो मारला स्ट्राइक एन्डला अन् रन आउटची विकेट मिळाली नॉन स्ट्राइक एन्डला (VIDEO)

Prashant Koratkar: प्रशांत कोरटकरची कळंबा कारागृहातून सुटका, पोलिस संरक्षणात बाहेर काढले -video

By सचिन यादव | Updated: April 11, 2025 14:46 IST

कोल्हापूर : राष्ट्रपुरुषांचा अवमान करून इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना मोबाइलवरून धमकावणारा प्रशांत मुरलीधर कोरटकर (रा. नागपूर ) याची ...

कोल्हापूर : राष्ट्रपुरुषांचा अवमान करून इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना मोबाइलवरून धमकावणारा प्रशांत मुरलीधर कोरटकर (रा.नागपूर) याची कळंबा कारागृहातून सुटका झाली. न्यायालयाने अटी-शर्तींसह ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर कोरटकरचा जामीन मंजूर केला होता. मात्र कागदपत्रांची पुर्तता न झाल्याने त्याचा कारागृहातील दोन दिवस मुक्काम वाढला होता. अखेर कडक पोलिस बंदोबस्तात कोरटकरला कारागृहातून बाहेर आणण्यात आले. यावेळी कारागृह परिसरात प्रचंड पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.दुपारी २.१५ मिनिटांनी कोरटकरला कारागृहातील अंडासेल मधून बाहेर काढले. त्यानंतर न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार त्याला पोलिसाच्या स्वाधीन केले अशी माहिती कारागृहातील वरिष्ठ अधीक्षक नागनाथ सावंत यांनी दिली.न्यायालयाने कोरटकरला बुधवारी (दि.९) जामीन मंजूर केला होता. मात्र, जामिनाचे पत्र कळंबा कारागृहात पोहोचू शकले नव्हते, त्यामुळे त्याची सुटका होऊ शकली नव्हती. कागदपत्रांची पूर्तता होताच आज, शुक्रवारी सुटका झाली. सुनावणीवेळी कोरटकरवर न्यायालय परिसरात हल्ल्याचा प्रयत्न झाला होता. त्यामुळे कडक पोलिस बंदोबस्तात त्याला कारागृहातून बाहेर काढले.कोरटकर याने २५ फेब्रुवारीच्या रात्री इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना फोन करून छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केले होते. यानंतर तो फरार झाला होता. त्याला २५ मार्च रोजी अटक झाली. पाच दिवसांच्या पोलिस कोठडीनंतर त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली होती. त्यानंतर, त्याने वकिलांमार्फत जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र, सरकारी वकील आणि फिर्यादींच्या वकिलांनी केलेल्या जोरदार युक्तिवादामुळे कोरटकरचा कोठडीतील मुक्काम वाढला होता. अखेर बुधवारी न्यायालयाने त्याचा जामीन मंजूर केला.

अटींचे पालन करण्याच्या सूचना  फिर्यादी आणि तपास अधिकाऱ्यांवर दबाव आणू नये. पुरावे नष्ट करू नयेत. चौकशीत पोलिसांना सहकार्य करावे. पोलिसांच्या परवानगीशिवाय बाहेरगावी जाऊ नये, अशा अटींचे पालन करण्याच्या सूचना त्याला न्यायाधीशांनी दिल्या आहेत.

टॅग्स :nagpurनागपूरkolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसPrisonतुरुंग