शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ठाण्यात EVM पडले बंद
2
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
3
राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
4
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
5
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात
6
चप्पल व्यापाऱ्याकडे छापा; नोटा पाहून अधिकारी थक्क, ४० कोटींची रोकड जप्त! 
7
‘आप’ला चिरडण्याचे कारस्थान; भाजपने सुरू केले ‘ऑपरेशन ब्रूम’; केजरीवाल यांचा आरोप
8
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
9
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
10
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
11
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
12
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
13
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
14
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
15
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
16
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
17
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
18
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
19
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
20
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट

पंतप्रधान सन्मान योजना: अपात्र शेतकऱ्यांची वसुली मोहीम ठप्प, कोल्हापूर जिल्ह्यात 'इतके' शेतकरी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2023 6:22 PM

अपात्र खातेदारांकडून पैसे वसूल करणे अवघड

राजाराम लोंढेकोल्हापूर : पंतप्रधान सन्मान योजनेंतर्गत खातेदार शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये पेन्शन दिली जाते. यामध्ये जिल्ह्यात २० हजार ९८५ शेतकरी अपात्र ठरले आहेत. या शेतकऱ्यांकडून घेतलेल्या लाभाचे पैसे वसूल करण्याचे आदेश देण्यात आले; मात्र गेल्या वर्षभरात त्यात फारसे यश आले नाही. केंद्र सरकारने या शेतकऱ्यांचा तेरावा हप्ता थांबवला असला तरी वसुलीची मोहीम ठप्पच आहे.देशातील शेतकऱ्यांना आर्थिक हातभार लावण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘पीएम किसान’ सन्मान योजना सुरू केली. चार महिन्याला दोन हजार रुपये असे वर्षाला सहा हजार रुपये शेतकऱ्यांना पेन्शन म्हणून दिले जातात. जिल्ह्यात ५ लाख ४९ हजार ३०७ लाभार्थी होते. मात्र, यातील लाभार्थ्यांची चौकशी केली असता निकष डावलून पैसे घेणारे लाभार्थी समोर आले. यामध्ये तब्बल २० हजार ९८५ खातेदार अपात्र ठरले. यामध्ये ज्यांच्या नावावर जमीनच नाही, पती-पत्नी दोघेही लाभ घेत आहेत, आयकर परतावा करणारे, इतर पेन्शन घेणाऱ्यांचा समावेश आहे. संबंधित खातेदारांची पेन्शन बंद करून त्यांनी घेतलेल्या लाभाची रक्कम वसूल करण्याचे आदेश केंद्र सरकारने महसूल विभागाला दिले होते. महसूल विभागाने अपात्र शेतकऱ्यांची नावे कळवूनही त्यांच्या नावावर बाराव्या हप्त्याचे पैसे आले होते. मात्र, तेराव्या हप्त्याचे पैसे संबंधितांच्या खात्यावर जमा झालेले नाहीत.मयत शेतकऱ्यांचे वसूल कोणाकडून करायचे?केंद्र सरकारने अपात्र शेतकऱ्यांकडून पैसे वसूल करण्याचे आदेश दिले असले तरी खर्च झालेले पैसे वसूल करणे तितकेसे सोपे नव्हते. मुळात योजनेचा लाभ देण्यापूर्वीच सर्व कागदपत्रांची पडताळणी करून पात्र, अपात्र ठरविणे कायद्याने अपेक्षित आहे. लाभ घेतल्यानंतर त्याला अपात्र ठरविणे व त्यांच्याकडून पैसे वसूल करणे अडचणीचे ठरू शकते. त्यात काही लाभार्थी मयत आहेत, ते पैसे कोणाकडून वसूल करायचे, असा प्रश्न आहे.महसूल विभागाने नाक दाबण्याची गरजअपात्र खातेदारांकडून पैसे वसूल करणे अवघड आहे. ज्यांना एका हप्त्यात परत करता येत नसतील तर टप्पे पाडून ती रक्कम वसूल केली पाहिजे. ज्यांना शक्य आहे, पण भरायची मानसिकता नाही, त्यांचे नाक दाबण्याची गरज आहे.आयकर दात्यांकडून २.४० कोटी वसूलगेल्या दीड वर्षात आयकरदात्या लाभार्थ्यांकडून बऱ्यापैकी वसुली झाली आहे. जिल्ह्यात २,३७१ आयकर भरणारे खातेदार होते. त्यांच्याकडून २ कोटी ४० लाखांची वसुली झाली आहे.दुहेरी लाभार्थ्यांची पाठकेंद्र सरकारच्या या योजनेनुसार एका कुटुंबातील एकालाच लाभ घेता येतो. मात्र, पती व पत्नी दोघांनीही लाभ घेतला आहे. जिल्ह्यात असे १७०० खातेदार आहेत. त्यांच्याकडून एक रुपयाही वसूल झालेला नाही.

तालुकानिहाय अपात्र खातेदार असे -तालुका - अपात्र खातेदारकरवीर - २७८०कागल - २३६०राधानगरी - ३२००शाहूवाडी - १७२०पन्हाळा - २२००गगनबावडा - ७००भुदरगड - १९३०शिरोळ - १४८०हातकणंगले - ११३०गडहिंग्लज - १४३२आजरा - १०७७चंदगड - ९७६

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPM Kisan Schemeप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनाFarmerशेतकरी