शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
3
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
4
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
5
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
6
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
7
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
8
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
9
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
10
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
11
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
12
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख
13
Stock Market Today: १७८ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकमध्ये जोरदार तेजी, FMGC आपटले
14
नियंत्रण कक्षात आला एक फोन कॉल; अवघ्या १२ मिनिटांत पोलिस पोहचले अन् मिळालं जीवदान
15
टॅरिफवर ट्रम्प यांचा आणखी एक यु-टर्न; आता 'या'वरील आयात शुल्क कमी करण्याची घोषणा
16
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
17
Akshaya Tritiya 2025: सोन्याची किंमत पाहून फुटतोय घाम? 'हा' आहे २४ कॅरेट सोनं स्वस्तात खरेदी करायचा जुगाड
18
भरत जाधवचं 'सही रे सही' नाटक कधी निरोप घेणार? केदार शिंदे म्हणाले, "ज्या दिवशी तो..."
19
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
20
शाहरुख, सलमान की आमिर- कोणासोबत काम करायला जास्त आवडतं?; परेश रावल म्हणाले...

प्रायोगिक तत्त्वावर उचगाव, मुडशिंगी, कळंबा येथे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2020 13:47 IST

पंचगंगा नदीत मिसळणारे प्रदूषित पाणी रोखण्यासाठी सरनोबतवाडी ते उचगाव, मुडशिंगी ते गांधीनगर तसेच कळंबा ते मोरेवाडी या ठिकाणी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारला जाणार आहे.

ठळक मुद्देपंचगंगा प्रदूषण संदर्भातील बैठकीत निर्णय प्राधिकरणातील गावांमध्ये कचऱ्यासाठी क्लस्टर उभारणार

कोल्हापूर : पंचगंगा नदीत मिसळणारे प्रदूषित पाणी रोखण्यासाठी सरनोबतवाडी ते उचगाव, मुडशिंगी ते गांधीनगर तसेच कळंबा ते मोरेवाडी या ठिकाणी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारला जाणार आहे.

प्रायोगिक तत्त्वावर हे काम करून त्यानंतर ग्रामीण भागातील नाल्यांवर असे प्रकल्प उभारण्याचा निर्णय मंगळवारी घेण्यात आला. तसेच कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरणामध्ये येणाऱ्या गावात कचऱ्यासाठी क्लस्टर करावे, असेही निर्देश प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांना यावेळी देण्यात आले.पंचगंगा प्रदूषणासंदर्भात बैठकीसाठी उद्या, गुरुवारी पुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर हे दौऱ्यांवर येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळ, जिल्हा परिषद, कोल्हापूर विकास क्षेत्र प्राधिकरण, महापालिका अधिकाऱ्यांची बैठक झाली.

अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल होते. प्रमुख उपस्थिती महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, करवीरचे प्रांताधिकारी वैभव नावडकर, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी प्रशांत गायकवाड, कोल्हापूर विकास क्षेत्र प्राधिकरणचे अधिकारी शिवराज पाटील, जि.प.च्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रियदर्शिनी मोरे, पर्यावरणतज्ज्ञ उदय गायकवाड, आदींची होती.अमन मित्तल म्हणाले, पंचगंगा नदी प्रदूषण रोखण्यासाठी नदीकाठावरील गावांमधून येणारे पाणी थांबविले पाहिजे. यासाठी जिल्हा परिषद व प्राधिकरणाकडून हवे ते सहकार्य केले जाईल. तसेच, गावातून येणारे सांडपाणी गावातच शुद्ध करण्यासाठी प्रयत्न केले जातील.

यामध्ये सरनोबतवाडी ते उचगाव, मुडशिंगी ते गांधीनगर व कळंबा ते मोरेवाडीमध्ये सांडपाणी प्रकल्प उभारण्यासाठी अधिकारी प्रत्यक्ष जाऊन पाहणी करतील. त्यानंतर योग्य ठिकाणी हा प्रकल्प उभारला जाईल.

यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. यापैकी दोन जागांवर सांडपाणी प्रकल्प उभारला तर लोकांना याची माहिती पटवून देता येणार आहे. त्यामुळे गावागावात होणाऱ्या सांडपाण्याकडे लोक गांभीर्याने बघायला लागतील आणि प्रदूषण कमी होण्यास मदत होणार आहे.दरम्यान, तेरवाड बंधाऱ्यावर वारंवार मासे मृत होत आहेत. या ठिकाणी पाणी अडवले जाते. हे पाणी बंधाऱ्याच्या क्षमतेपक्षा १६ टक्के पाणी प्रवाहीत केले पाहिजे. तरच प्रदूषणाला आळा बसेल असे चित्र आहे. त्यामुळे हे पाणी प्रवाहित करण्याबाबतही निर्णय झाला आहे. इचलकरंजी येथील प्रदूषण रोखण्यासाठी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासाठी असलेल्या पूर्वीच्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकून नव्याने निविदा प्रक्रिया राबविण्याचे यावेळी ठरले.

प्राधिकरणच्या गावांत कचऱ्यासाठी क्लस्टरकोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरणामध्ये येणाऱ्या गावातील कचऱ्यासाठी क्लस्टर तयार करावेत, त्यासाठी गावनिहाय, कॉलनीनिहाय जागानिश्चित करावी, असे निर्देश प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांना यावेळी देण्यात आले. 

 

टॅग्स :pollutionप्रदूषणkolhapurकोल्हापूर