शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

डॉक्टरांच्या अपुऱ्या संख्येमुळे रुग्णांची हेळसांड-: पन्हाळा तालुक्यातील चित्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2019 23:57 IST

पन्हाळा तालुक्यात सहा प्राथमिक आरोग्य केंद्रे त्याच्या अंतर्गत ४0 उपकेंद्रे, जिल्हा परिषदेचे दोन फिरते दवाखाने, सहा रुग्णवाहिका व १०८ च्या तीन रुग्णवाहिका यांच्या माध्यमातून तालुक्याच्या डोंगराळ आणि दुर्गम भागात आरोग्य यंत्रणा राबविली

ठळक मुद्दे काही केंद्रांमध्ये आर्थिक पिळवणूक; फिरत्या दवाखान्यांचे अस्तित्व नाही

नितीन भगवान ।पन्हाळा : पन्हाळा तालुक्यात सहा प्राथमिक आरोग्य केंद्रे त्याच्या अंतर्गत ४0 उपकेंद्रे, जिल्हा परिषदेचे दोन फिरते दवाखाने, सहा रुग्णवाहिका व १०८ च्या तीन रुग्णवाहिका यांच्या माध्यमातून तालुक्याच्या डोंगराळ आणि दुर्गम भागात आरोग्य यंत्रणा राबविली जात आहे. त्याचवेळी एम.बी.बी.एस. झालेल्या डॉक्टरांची संख्या कमी, प्राथमिक आरोग्य कें द्रात होणारी रुग्णांची आर्थिक पिळवणूक, फिरत्या दवाखान्यांचे नसलेले अस्तित्व, यामुळेही रुग्णांची हेळसांड होत आहे.

बोरपाडळे व केखले प्राथमिक आरोग्य केंद्र वगळता अन्य केंद्रांवर रुग्णांची संख्या फारशी नाही. याला कारण एम.बी.बी.एस. डॉक्टरांची संख्या कमी आहे. एम.बी.बी.एस. डॉक्टर तालुक्यात नऊ आहेत. त्यापैकी दोन बाहेरगावी अतिरिक्तकार्यभारावर आहेत, तर परिचारिका केवळ १२ आहेत, तर आरोग्यसेवक मंजूर पदे ५१ असून, ४५ इतके कामावर आहेत. सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्रे सुसज्ज व चांगल्या इमारतींत आहेत; पण कर्मचाऱ्यांच्या राहण्याच्या गैरसोयीच्या इमारती असल्याने बहुतेक ठिकाणी रात्री आरोग्य केंद्रे कुलूपबंद असतात. यात पडळ परिसरातील उपकेंदे्र आघाडीवर आहेत. लोकप्रतिनिधी व जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य दक्ष असल्याने औषधे पुरेशी उपलब्ध आहेत, तर पन्हाळा तालुका डोंगराळ व दुर्गम असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सर्पदंश लस ठेवावी लागत असून, त्याचा साठा कायमस्वरूपी शिल्लक असतो.

गोवर, रुबिला लसीकरण यावर्षी ९९ टक्केकेले आहे, तर कुटुंब नियोजन ८५ टक्के केले गेले आहे. पावसाळा व उन्हाळ्यात साथीचे रोग आल्यास तालुक्याच्या आरोग्य यंत्रणेवर ताण पडत असल्यास कोल्हापूर शासकीय दवाखान्याचा आधार घेतला जातो. प्राथमिक आरोग्य केंद्रावर रुग्णवाहिकेंची सोय चांगली आहे, तर १०८ रुग्णवाहिका जोतिबा, कळे, कोडोली येथे कार्यरत आहेत. त्यापैकी बाजारभोगाव येथील १०८ रुग्णवाहिका राजकीय हस्तक्षेप होत कळे येथे नेल्याने बाजारभोगाव व येथील दुर्गम गावातील रुग्णांची गैरसोय होत आहे. बहुतेक उपकेंद्रांवर लसीकरणाच्या नावाखाली दर्शविणारी अनुपस्थिती, तर कोडोली उपकेंद्रावर गेल्या तीन वर्षांपासून तंत्रज्ञ नसल्याने एक्स-रे मशीन धूळ खात पडलेली आहे.

बोरपाडळे आरोग्य केंद्र सेवेत अग्रेसरबाजारभोगाव, बोरपाडळे, कळे, केखले, कोतोली, पडळ या सहा ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत. तालुक्यात १११ गावे व वाड्यावस्त्या आहेत. जिल्हा परिषद फिरते दवाखाने, आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे या सर्वांची संख्या ४८ इतकी आहे. पन्हाळा व कोडोली या ठिकाणी शासकीय दवाखाने आहेत. यापैकी बोरपाडळे प्राथमिक आरोग्य केंद्राला राष्ट्रीय मानांकन प्राप्त झाले आहे.महाराष्ट्रात दुसरा क्रमांक, तर जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळालेला आहे. बोरपाडळे प्राथमिक आरोग्य केंद्राने चांगली कामगिरी बजावत २०१५ मध्ये वैद्यकीय क्षेत्रातील आय.एस.ओ. समजले जाणारे एन.ए.बी.एच. हे मानांकन प्राप्त केले आहे. विविध आरोग्य योजना राबविण्यात पन्हाळा तालुका आघाडीवर आहे. मात्र, मुलींचा जन्मदर अजूनही म्हणावा इतका सुधारलेला नाही.

केखले प्राथमिक आरोग्य केंद्र तेथील डॉ. पाटील यांच्या चांगल्या वर्तणुकीमुळे नावारूपास येत आहे. रोज सरासरी २५० ते ३०० रुग्ण या ठिकाणी उपचारांसाठी येत असतात.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलkolhapurकोल्हापूर