शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

'कोल्हापूर कस्सं'वरून सोशल मीडियात जुंपली; सतेज पाटील-कृष्णराज महाडिकांच्या कमेंटनंतर राजकारण तापले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2025 12:35 IST

विशेष म्हणजे आरजेच्या पोस्टवर प्रतिक्रियांचा पाऊस पडला

कोल्हापूर : ऐन महापालिका निवडणुकीत 'कोल्हापूर कस्सं? तुम्ही म्हणशीला तस्सं' या काँग्रेसच्या मोहिमेवरून आता राजकारण तापले आहे. या कॅम्पेनचे बॅनर शहरभर लागल्यानंतर त्यावर एका आरजेने यावर इन्स्टावर रिल करत खरंच आम्ही म्हणतोय तसं होणार का? रस्त्यांची वाट लागलीय, रंकाळ्याचा विषय आहे, पाण्याची बोंबाबोब आहे, ही पतंगबाजी आहे अशी टिप्पणी केली. त्यावर काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी बदल घडवण्यासाठी आणि हे स्वप्न साकार करण्यासाठी मी एक पाऊल टाकत आहे. आपणही सोबत या अशी हाक दिली. सोशल मीडियावर रंगलेल्या या पोस्टबाजीनंतर खासदार धनंजय महाडिक यांचे सुपुत्र कृष्णराज महाडिक यांनी ज्या लोकांनी हा टॅगलाईन दिला आहे, तेच लोक अनेक वर्षे महानगरपालिकेत सत्तेत होते. त्या काळात कोल्हापूरच्या अपेक्षित विकासासाठी ते का अपयशी ठरले? असा सवाल केला आहे. महाडिक यांच्या पोस्टनंतर सोशल मीडियावर राजकारण रंगले आहे. विशेष म्हणजे आरजेच्या पोस्टवर प्रतिक्रियांचा पाऊस पडला आहे. मतदान करताना शेवटी दारूची बाटली, जेवणं आणि कोणाचं पाकीट यावरच मतदान होणार.. मग कश्याला चांगले रस्ते, स्वच्छ पाणी आणि चांगल्या सुविधा मिळत्यात? अशा विचारणा अनेकांनी केल्या आहेत.

गेल्या साडेचार वर्षांत राज्यात सरकार महायुतीचे आहे. त्यांच्या काळात रस्त्यावर धूळ का, पिण्याचे पाण्याची पाणीपुरवठा व्यवस्थित होत नाही. खड्ड्यांतून रस्ते शोधून सापडत नाहीत हे पोस्ट करणाऱ्यांना दिसत नाही हेच दुर्दैव आहे. राज्य सरकारने सत्तेच्या काळात कोल्हापूरला काय दिले हे त्यांनी सांगावे. काँग्रेसची टॅगलाईन लोकांनी उचलून धरली आहे याचाच पोटशूळ पोस्ट करणाऱ्यांना उठला आहे. - राजेश लाटकर, नेते,काँग्रेस.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur Municipal Elections: Political Heat Rises Over 'Kolhapur Kassa' Campaign

Web Summary : The Congress's 'Kolhapur Kassa' campaign sparked political debate before municipal elections. Criticism over roads and water issues led to heated exchanges between Satej Patil and Krishna Raj Mahadik regarding Kolhapur's development under previous administrations.
टॅग्स :Kolhapur Municipal Corporation Electionकोल्हापूर महानगरपालिका निवडणूक २०२६kolhapurकोल्हापूरMunicipal Electionमहानगरपालिका - नगरपालिका निवडणूक २०२६congressकाँग्रेसSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलDhananjay Bhimrao Mahadikधनंजय भीमराव महाडिकPoliticsराजकारण