शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
3
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
4
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
5
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
6
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
7
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
8
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
9
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
10
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
11
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
12
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
13
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
14
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
15
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
16
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
17
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
18
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
19
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
20
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur Municipal Election: आरक्षण पडले; राजकारण तापले, महाविकास आघाडीत अद्याप 'वेट अँड वॉच'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 18:11 IST

काँग्रेस पक्षावरच ‘मविआ’ची भिस्त

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने महायुतीतील घटक पक्षांत राजकीय हालचाली गतिमान झाल्या असल्या तरी महाविकास आघाडीत मात्र अद्याप शांतता आहे. आघाडीतील घटक पक्षांच्या नेत्यांचीही चर्चा अद्याप झालेली नाही. नगरपालिका, नगरपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका झाल्यानंतरच नेते महापालिका निवडणूक अजेंड्यावर घेतील. मात्र तरीही काँग्रेस पक्षातील दुसऱ्या-तिसऱ्या फळीतील कार्यकर्ते निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत.महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस पक्षातील अनेक माजी नगरसेवक पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात गेले. काँग्रेसला अगदी सुरुवातीलाच जोरदार झटका बसला. त्यामुळे काँग्रेसला आपल्या पक्षातील पडझड सावरूनच पुन्हा ताकदीने निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे. सध्या काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील नगरपालिका, पंचायत समिती निवडणुकीत व्यस्त आहेत. शिवाय पक्षाच्या मुंबईत होत असलेल्या बैठकीतही सहभागी होत असल्याने त्यांना महापालिकेच्या घडामोडींकडे लक्ष देता आले नसल्याचे काँग्रेस पक्षातून सांगण्यात येते.जेव्हा काँग्रेसमधून काही माजी नगरसेवकांनी शिंदे सेनेत प्रवेश केला, तेव्हा आमदार सतेज पाटील यांनी एक बैठक घेतली होती. लढायचे असेल तर ठामपणे पाठीशी राहा, ज्यांना कोणाला जायचे असेल तर त्यांनी आधीच सांगावे, असेही त्यांनी बैठकीत सांगून टाकले होते. त्यामुळे उपस्थित जवळपास ४० ते ४५ माजी नगरसेवकांनी आम्ही काँग्रेससोबत आहोत, अशी ग्वाही दिली होती. त्यानुसार सर्वच माजी नगरसेवक तसेच शहर काँग्रेस समितीचे काही पदाधिकारी निवडणुकीची प्राथमिक तयारी करताना पाहायला मिळत आहेत. उमेदवारी मागणीचे अर्ज वाटप येत्या एक-दोन दिवसात होणार आहे. ज्यांना उमेदवारी पाहिजे, त्यांनी छापील अर्ज भरुन द्यावे लागणार आहे.राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांची जयंत पाटील यांच्याशी चर्चाराष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी माजी प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांची इस्लामपूर येथे भेट घेऊन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या बाबतीत चर्चा केली. जिल्हाध्यक्ष व्ही.बी. पाटील, शहराध्यक्ष आर.के. पोवार, माजी आमदार राजीव आवळे, अनिल घाडगे, बाजीराव खाडे यांच्यासह अन्य प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. आमदार पाटील यांनी जिल्ह्यातील पक्षाची ताकद, निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांबाबत माहिती घेतली. सर्वच निवडणुकांसाठी मतदारसंघनिहाय उमेदवारांच्या याद्या तयार करा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.

उद्धेव सेनेचे नेते माजी खासदार विनायक राऊत, अरुण दुधवडकर यांनीही कोल्हापुरात येऊन पक्षाचे पदाधिकारी, प्रमुख कार्यकर्ते यांच्याशी निवडणुकीबाबत चर्चा केली आहे. त्यांच्याकडून प्रभागनिहाय उमेदवारांची यादी तयार केली जात आहे.

सतेज पाटील यांच्यावरच भिस्तमहाविकास आघाडीची सगळी भिस्त आमदार सतेज पाटील यांच्यावरच असेल. राष्ट्रवादी, उद्धव सेना यांच्याशी चर्चा करुन आमदार पाटील यांना उमेदवाराची कदाचित अदलाबदलही करावी लागण्याची शक्यता आहे. दोन्ही पक्षांना पुरेसे उमेदवार न मिळाल्यास काँग्रेसलाच त्यात पुढाकार घ्यावा लागण्याची शक्यता आहे.

डाव्या पक्षांची पाच जागांची मागणीकाँग्रेस पक्षाला डाव्या पक्षांनाही सोबत घ्यावे लागणार आहे. त्यामुळे या पक्षांकडूनही उमेदवारी मागितली जाणार आहे. भाकप तर्फे पाच कार्यकर्ते निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. या पाच जागांची मागणी आघाडीकडे करण्यात येणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur Election Heats Up; Maha Vikas Aghadi Awaits and Watches

Web Summary : Kolhapur's municipal election sees activity in Mahayuti, while Maha Vikas Aghadi stays quiet. Congress prepares amid internal shifts. Nationalist Congress discusses strategy with Jayant Patil. All eyes are on Satej Patil for alliance coordination.