शाहूवाडीत सुमारे ११९०९ बालकांना पोलिओ लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:54 IST2021-02-05T06:54:19+5:302021-02-05T06:54:19+5:30

दरम्यान, तालुक्यातील एकही लहान बालक या लसीकरणापासून वंचित राहू नये म्हणून जि. प.चे बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती हंबीरराव ...

Polio vaccination to about 11909 children in Shahuwadi | शाहूवाडीत सुमारे ११९०९ बालकांना पोलिओ लसीकरण

शाहूवाडीत सुमारे ११९०९ बालकांना पोलिओ लसीकरण

दरम्यान, तालुक्यातील एकही लहान बालक या लसीकरणापासून वंचित राहू नये म्हणून जि. प.चे बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती हंबीरराव पाटील यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. एच. आर. निरंकारी, डॉ. प्रबोधन जेडगे, डॉ. नरेंद्र माळी आदी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ९ प्राथमिक आरोग्य केंद्रे , ३० उपकेंद्रे , ४ आयुर्वेदिक रुग्णालये व १ ग्रामीण रुग्णालय यांच्यामार्फत तालुक्यात ठिकठिकाणी एकूण १६७ केंद्रे उभारण्यात आली होती. या सर्व केंद्रांवरती बालकांना या मोहिमेंतर्गत पल्स पोलिओचे लसीकरण करण्यात आले.

तसेच ऊसतोड मजुरांची मुले, रस्ते कामावरील कामगारांची मुले, तसेच दुर्गम भागातील धनगरवाड्यावरील मुले यांना लसीकरण करण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या विशेष पथकांच्या नेमणुका करून या पथकांद्वारे तेथील बालकांना लसीकरण करण्यात आले.

Web Title: Polio vaccination to about 11909 children in Shahuwadi