Kolhapur Crime: जबाब घेण्यासाठी गेलेल्या पोलिसाने आयसीयूमध्ये काढली मुलीची छेड, गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2025 12:04 IST2025-04-04T12:04:04+5:302025-04-04T12:04:51+5:30
कोल्हापूर : एका खासगी रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये दाखल असलेल्या १५ वर्षाच्या मुलीचा जबाब घेण्यासाठी गेलेल्या पोलिस चेतन दिलीप घाटगे याने ...

Kolhapur Crime: जबाब घेण्यासाठी गेलेल्या पोलिसाने आयसीयूमध्ये काढली मुलीची छेड, गुन्हा दाखल
कोल्हापूर : एका खासगी रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये दाखल असलेल्या १५ वर्षाच्या मुलीचा जबाब घेण्यासाठी गेलेल्या पोलिस चेतन दिलीप घाटगे याने तिची छेड काढल्याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे पोलिस दलामध्ये खळबळ उडाली आहे.
पीडित मुलीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याने तिला शहरातील एका खासगी रुग्णालयात आयसीयू विभागात दाखल करण्यात आले होते. तिचा जबाब घेण्यासाठी बुधवारी रात्री साडेआठ ते नऊच्या सुमारास घाटगे रुग्णालयात गेला होता. यावेळी चेतन याने आपला मोबाईल नंबर तिला देऊन तू माझी मैत्रीण आहेस असे म्हणत तिच्या पाठीवरून, छातीवरून हात फिरवून, तू भिऊ नकोस, काही अडचण असल्यास मला फोन कर असे सांगून लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केल्याची तक्रार करण्यात आली आहे.
त्यानुसार पोलिसांनी प्राथमिक चौकशी करून भारतीय न्याय संहिता कलम ७५ (१) (आय) लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ८,९,१२ प्रमाणे गुरुवारी रात्री ११ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला. घाटगे हा ज्या पोलिस ठाण्यात कार्यरत आहे त्याच ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक संतोष डोके अधिक तपास करत असून सहा. पोलिस निरीक्षक क्रांती पाटील यांनी हा गुन्हा दाखल केला आहे.