लक्ष्मीपुरी ठाण्यातील पोलिसाने वाचविला बुडणाऱ्या महिलेचा जीव; धाडसी कामगिरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2026 13:25 IST2026-01-26T13:25:03+5:302026-01-26T13:25:44+5:30

वेळेत मदत झाल्याने जीवदान

policeman from laxmipuri police station saves drowning woman life Brave act | लक्ष्मीपुरी ठाण्यातील पोलिसाने वाचविला बुडणाऱ्या महिलेचा जीव; धाडसी कामगिरी

लक्ष्मीपुरी ठाण्यातील पोलिसाने वाचविला बुडणाऱ्या महिलेचा जीव; धाडसी कामगिरी

कोल्हापूर: येथील लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यातील पोलिस गौतम कृष्णात काबळे यांनी रविवारी गौतम कांबळे पंचगंगा नदीच्या पाण्यात बुडणाऱ्या महिलेचा जीव वाचविला. जीवाच्या आकांताने ती हातपाय हलवत तरंगत होती. बघ्यांची गर्दी झाली होती; पण कोणीही पाण्यात उडी मारून तिला बाहेर 
काढण्याचे धाइस करीत नव्हते. पोलिस गौतम यांनी अंगातील वर्दीनिशी पाण्यात उडी मारून धाडसाने पोहत बुडणाऱ्या त्या महिलेस जीवदान दिले.शहनाज रफिक शेख (वय ३४. रा. जरगनगर, कोल्हापूर, मूळ आपटी ता. पन्हाळा) असे त्या महिलेचे नाव आहे. तिव्यावर सीपीआरमध्ये उपचार सुरु आहेत.

पंचगंगा नदीवरील स्मशानभूमीच्या मागील बाजूच्या नदीपात्रात सकाळी साडेनऊच्या सुमारास एक महिला बुडत होती. ती गटांगळ्या खात तरंगताना काही लोकाना दिसली तेथील नागरिकांनी ११२ नंबरवर संपर्क करून ही माहिती दिली. तातडीने लक्ष्मीपुरीचे पोलिस गौतम कावळे तेथे पोहोचले. त्यावेळी महिला पाण्यात बुडत असल्याचे दिसले. क्षणाचाही विचार न करता गौतम यांनी खिशातील कागद, मोबाईल दुसन्याकडे दिला आणि वर्दीनिशी पाण्यात उडी घेतली. पोहत शहनाज या बुडणान्या महिलेजवळ ते पोहोचले तिला पाण्याच्या काठावर ओढत आणले काठावर आणून १०८ रुग्णवाहिकेतून उपचारासाठी तिला सीपीआरमध्ये दाखल केले.

तातडीने उपचार झाल्याने तिची प्रकृती सुधारली आहे. त्याची नोंद करवीर पोलिसांमध्ये झाली आहे. ती महिला पाण्यात कशी पडली याचा शोध पोलिस घेत आहेत.

Web Title : कोल्हापुर: पुलिसकर्मी ने पंचगंगा नदी में डूबती महिला को बचाया

Web Summary : कोल्हापुर में पुलिस कांस्टेबल गौतम कांबले ने पंचगंगा नदी में डूब रही एक महिला को बहादुरी से बचाया। उन्होंने तुरंत नदी में छलांग लगा दी और उसे सुरक्षित बाहर निकाला। महिला, जिसकी पहचान शहनाज रफीक शेख के रूप में हुई, का सीपीआर अस्पताल में इलाज चल रहा है। पुलिस जांच कर रही है कि वह नदी में कैसे गिरी।

Web Title : Kolhapur Cop Saves Drowning Woman in Panchganga River: Heroic Act

Web Summary : Kolhapur police constable Gautam Kable bravely rescued a woman drowning in the Panchganga River. He jumped into the river, fully clothed, and pulled her to safety. The woman, identified as Shahaj Rafik Sheikh, is now receiving treatment at CPR hospital. Police are investigating how she fell into the river.