कोल्हापूर : गोकुळ शिरगाव येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत गेलेला प्रा.सौरभ संजय जोशी (वय ३०, रा.बाबूजमाल दर्ग्याजवळ, कोल्हापूर) याचा पोलिसांनी सोमवारी (दि. ९) पुन्हा ताबा घेतला. त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी मिळाली. त्याच्या चौकशीतून गुन्ह्याची व्याप्ती वाढण्याची शक्यता पोलिस अधिकाऱ्यांनी वर्तविली.विद्यार्थिनींना वारंवार फोन आणि मेसेज करून केबिनमध्ये एकांतात बोलवून विनयभंग केल्याप्रकरणी प्रा.जोशी याच्यावर गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. पोलिसांनी त्याला शनिवारी न्यायालयात हजर केले असता, त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली होती. दरम्यान, त्याच्या विरोधात १२ विद्यार्थिनींनी तक्रार अर्ज दिल्याने गुन्ह्याचे गांभीर्य वाढले होते. त्याची चौकशी करण्यासाठी पुन्हा ताबा मिळावा, अशी मागणी गोकुळ शिरगाव पोलिसांनी सोमवारी न्यायालयात केली.न्यायालयाने याला परवानगी देऊन जोशीला तीन दिवसांचा पोलिस कोठडी सुनावली. पोलिसांनी तातडीने कळंबा मध्यवर्ती कारागृहातून त्याचा ताबा घेतला. वाढलेल्या तक्रारींच्या अनुषंगाने त्याची चौकशी सुरू आहे. लवकरच त्याला सोबत घेऊन त्याच्या घराची झडती घेतली जाणार आहे, तसेच गुन्हा घडलेल्या ठिकाणी त्याला फिरवून अधिक तपास केला जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.
प्रा.जोशी याच्या विरोधात तक्रारी वाढल्याने पुन्हा त्याची चौकशी करण्याची गरज निर्माण झाली होती. त्यानुसार, न्यायालयात अर्ज करून त्याचा ताबा घेण्यात आला. तीन दिवसांच्या पोलिस कोठडीत तपासाला गती येईल. त्याच्या विरोधातील पुरावे गोळा करता येतील. - सुजीत क्षीरसागर - पोलिस उपअधीक्षक
Web Summary : Professor Saurabh Joshi, accused of molesting students, is back in police custody. Facing multiple complaints, he's remanded for three days. Police anticipate a wider investigation into the case, including searching his residence and revisiting the crime scene.
Web Summary : छात्रों से छेड़छाड़ के आरोपी प्रोफेसर सौरभ जोशी को पुलिस हिरासत में वापस लिया गया। कई शिकायतों का सामना करते हुए, उन्हें तीन दिन की रिमांड पर भेजा गया है। पुलिस को मामले की व्यापक जांच की उम्मीद है, जिसमें उनके आवास की तलाशी और अपराध स्थल पर दोबारा जाना शामिल है।