शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: पुजाऱ्याला फसवणाऱ्या महिलेचा कोकणातही प्रताप, बनावट सोने तारण ठेवून बँकेतून घेतले कर्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 15:49 IST

तीन कोटींची खंडणी मागितल्याप्रकरणी तिच्यासह पाच जणांवर चार दिवसांपूर्वीच शहापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे

कोल्हापूर : जयसिंगपूर येथील सिद्धेश्वर मंदिराच्या पुजाऱ्याची फसवणूक करणारी स्नेहा संजय नारकर (वय ३५, रा. शिवाजी पेठ, कोल्हापूर) हिने चार साथीदारांसह कोकणात एका बँकेची फसवणूक केल्याचे पोलिसांच्या चौकशीत समोर आले. बनावट सोने तारण ठेवून कर्ज काढल्याप्रकरणी तिच्यासह पाच जणांवर कुडाळ आणि वैभववाडी (जि. सिंधुदुर्ग) पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. थकीत कर्जापोटी बँकांनी ओढून आणलेल्या कार कमी किमतीत मिळवून देण्याचे आमिष दाखवून तिने अनेकांना गंडा घातल्याचे पोलिसांनी सांगितले.जयसिंगपूर येथील नितीन दिलीप जंगम (वय ४०) यांना स्नेहा नारकर हिने व्यवसाय वाढवण्यासाठी दीड कोटींचे कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवले. तसेच कमी किमतीत कार मिळवून देण्याचे आमिष दाखवून ४३ लाख ७४ हजारांची फसवणूक केली. याप्रकरणी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून, पोलिसांनी तिला अटक केली आहे. तिने केलेल्या इतर गुन्ह्यांची माहिती पोलिसांना चौकशीतून मिळाली. तिने दोन वर्षांपूर्वी कोकणातील एका बँकेत बनावट सोने तारण ठेवून कर्ज घेतले होते. याप्रकरणी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ आणि वैभववाडी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. त्या गुन्ह्यात तिच्या इतर चार साथीदारांचा सहभाग होता.तीन कोटींची खंडणी मागितल्याप्रकरणी तिच्यासह पाच जणांवर चार दिवसांपूर्वीच शहापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्यातील इतर संशयितांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, पोलिस कोठडीची मुदत संपत असल्याने शुक्रवारी (दि. ६) तिला न्यायालयात हजर केले जाणार आहे.तक्रारी देण्याचे आवाहनथकीत कर्जापोटी बँकांनी ओढून आणलेल्या महागड्या कार कमी पैशात मिळवून देण्याचे आमिष दाखवून नारकर हिने अनेकांना गंडा घातला आहे. पैसे परत मिळावेत यासाठी त्यांनी तगादा लावताच नितीन जंगम यांची फसवणूक करून ४३ लाख ७४ हजार रुपये उकळल्याचे तिने पोलिसांना सांगितले. तिने अनेकांची फसवणूक केल्याची शक्यता आहे. संबंधितांनी पोलिस ठाण्यात तक्रारी द्याव्यात, असे आवाहन पोलिस निरीक्षक श्रीराम कन्हेरकर यांनी केले आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसvaibhavwadiवैभववाडी