कोल्हापूर : तस्करीतील गावठी पिस्तुलाची विक्री करण्यासाठी आलेला अजिंक्य जयसिंग भोसले (वय २८, सध्या रा. शिवाजी पेठ, कोल्हापूर, मूळ रा. म्हसवे, ता. भुदरगड) याला जुना राजवाडा पोलिसांनी पकडले. त्याच्याकडे विक्रीसाठी अवैध पिस्तूल देणारा छन्नुसिंह उर्फ चिन्मय विलास सरनोबत (३४, सध्या रा. साने गुरुजी वसाहत, कोल्हापूर, मूळ रा. तिरपण, ता. पन्हाळा) यालाही अटक केली.त्यांच्याकडून गावठी पिस्तूल, १४ जिवंत राउंड, दोन मॅगजिन, दोन दुचाकी आणि मोबाइल असा सुमारे पावणेतीन लाखांचा मुद्देमाल पोलिसांंनी जप्त केला. रामानंदनगर ते संभाजीनगर रोडवर मैलखड्डा येथे रविवारी (दि. २५) सायंकाळी साध्या वेशात सापळा रचून ही कारवाई केली. जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक किरण लोंढे यांनी दिलेल्या माहितीनुसार, अंमलदार सागर डोंगरे यांना अवैध पिस्तुलाच्या विक्रीची माहिती मिळाली होती. त्यानुसार उपनिरीक्षक महेश पाटील यांच्या पथकाने रविवारी सायंकाळी रामानंदनगर ते संभाजीनगर रोडवर मैलखड्डा येथे सापळा रचला.पिस्तूल विक्रीसाठी दुचाकीवरून आलेला संशयित अजिंक्य भोसले याला ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्याच्याकडे गावठी बनावटीचे पिस्तूल मिळाले. अधिक चौकशीत त्याने हे पिस्तूल छन्नुसिंह सरनोबत याच्याकडून आणल्याची कबुली दिली. पोलिसांनी तातडीने सरनोबत याला त्याच्या घरातून अटक केली. दोघांकडून सुमारे ५० हजार रुपये किमतीचे पिस्तूल, १४ जिवंत राउंड, दोन रिकामे मॅगजिन, दोन दुचाकी आणि मोबाइल असा पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त केला. न्यायालयात हजर केले असता दोघांना तीन दिवसांची पोलिस कोठडी मिळाली.बिहारी कामगाराकडून घेतल्याची कबुलीएका बिहारी कामगाराकडून पिस्तूल घेतल्याची कबुली अटकेतील छन्नुसिंह याने पोलिसांकडे दिली आहे. याची पडताळणी करण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. ते कोणाला विकले जाणार होते, याचाही तपास सुरू आहे. यातून गावठी पिस्तुलांच्या तस्करीचे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली.
Web Summary : Kolhapur police arrested two individuals, Ajinkya Bhosle and Channusingh Sarnobat, for attempting to sell an illegal pistol. Police seized a pistol, live rounds, magazines, motorcycles, and mobile phones worth ₹2.75 lakh. Sarnobat confessed to acquiring the pistol from a Bihari worker; investigation underway.
Web Summary : कोल्हापुर पुलिस ने अवैध पिस्तौल बेचने की कोशिश के आरोप में अजिंक्य भोसले और छन्नुसिंह सरनोबत को गिरफ्तार किया। पुलिस ने 2.75 लाख रुपये मूल्य की एक पिस्तौल, जिंदा कारतूस, मैगजीन, मोटरसाइकिल और मोबाइल फोन जब्त किए। सरनोबत ने एक बिहारी मजदूर से पिस्तौल लेने की बात कबूल की; जांच जारी है।