शहरं
Join us  
Trending Stories
1
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
Latest Marathi News LIVE Updates: सम्राट चौधरी बनले बिहारचे नवे मुख्यमंत्री; राज्यपालांनी दिली पद आणि गोपनीयतेची शपथ
3
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
4
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
5
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
6
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
7
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
8
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
9
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
10
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
11
"मी थकलेय, सकाळी नाश्ता मिळणार नाही"; नैराश्यातून आईने लेकीची केली हत्या, स्वतःलाही संपवले
12
देशात पेट्रोल १८, तर डिझेल ३५ रुपयांनी महाग होणार? तेल कंपन्यांना दररोज १,६०० कोटींचा फटका; निवडणुकीनंतर दरवाढीचे दणके
13
लहानग्यांसाठी 'या' देशात येतंय 'चाइल्ड सिम कार्ड'; इंटरनेटवर देणार सुरक्षा, भारतातही का गरजेचे?
14
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
15
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
16
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
17
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
18
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
19
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
20
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
Daily Top 2Weekly Top 5

कवितांनी इचलकरंजीतील रसिक मंत्रमुग्ध

By admin | Updated: September 23, 2014 21:40 IST

हिंदी कवी संमेलन : श्रीमंत घोरपडे नाट्यगृहात प्रभावी सादरीकरण

इचलकरंजी : हिंदी कवितांच्या प्रभावी सादरीकरणामुळे येथील श्रीमंत घोरपडे नाट्यगृहात झालेल्या हिंदी कवी संमेलनात रंगत आली. सागर त्रिपाठी, शकील आझमी, मुजावर मालेगावी, प्रज्ञा विकास, वर्षा बरखा, स्मिता आरजू, अजीम साद, सोहेल आझाद, शरदेंदू शुक्ल, इरफान शहानुरी व मेजर अजीम यांनी व्यंगात्मक हास्यतुषार, हळव्या शब्दांची पाखरण, गझलांचे गहिरी सादरीकरण करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.येथील मनोरंजन मंडळ, रोटरी क्लब सेंट्रल, दगडुलाल मर्दा फौंडेशन, मारवाडी युवा मंच, ह्युमन वेल्फेअर चॅरिटेबल ट्रस्ट आणि सांस्कृतिक कार्य संचलनालयांच्यावतीने कवी संमेलन आयोजित केले होते. अध्यक्षस्थानी कवी सागर त्रिपाठी होते. संजय होगाडे यांनी स्वागत व ओम पाटणी यांनी प्रास्ताविक केले. सागर त्रिपाठी यांनी सरस्वती वंदना हे गीत गायिले. ‘हे देखना है गरिबी में साथ देगा कौन, यही वक्त है आपनों को आजमाने का’ ही कवी अजीम साद यांची गझल श्रोत्यांची दाद घेऊन गेली. कवयित्री स्मिता आरजू यांनी प्रखर व्यंग व्यक्त करणारी प्रेम कविता सादर केली. स्त्री-भ्रूण हत्येवरील त्यांची ‘बेबस कविता रोती है, कोख में हत्या होती है, सृष्टी की जो जननी है, अंगारो पे सोती है’ ही कविता अंतर्मुख करायला लावणारी होती. बरखा यांनी देशप्रेमाची प्रचिती काव्यातून दिली. सोहेल आझाद यांच्या ‘हिंदी, मुस्लिम, शिख, इसाई कहते है, हिंदोस्तान हमको जान से प्यारा है, तन से जुदा ये सर भी कर डालोगे, कहते रहेंगे हिंदोस्तान हमारा है’ या काव्यपंक्ती रसिकांच्या दाद घेऊन गेल्या. शरदेंदू शुक्ल यांनी राजकीय व सामाजिक घटनांवर व्यंगात्मक कविता सादर केल्या. इरफान शहानुरी व प्रज्ञा विकास यांनीही कविता सादर केल्या. त्रिपाठी यांनी ‘बस दुकान के खोलते ही जोक सारे बिक गये, एक तनहा सच के लिए मै शाम तक बैठा रहा’ यांनी दाद मिळविली. अमर डोंगरे यांनी आभार व्यक्त केले. (प्रतिनिधी)हिंदी चित्रपट गीत व गझलाकार शकील आझमी यांच्या गझला थेट काळजाला हात घालणाऱ्या होत्या. ‘जो तेरे अ‍ैब बताते है उसे मत खोना, अब कहॉँ मिलते है आइने दिखानेवाले’, ‘पहन के झुठी हसी मैहफिलमें जाना क्या, उदास है उदासी मे मुस्कुराना क्या’, ‘परो को खोल, जमाना उडान देखता है, जमीन पे बैठके क्या आसमान देखता है’ या गझलांना टाळ्या मिळाल्या.