पोलीस बंदोबस्तात पिशवी येथे गायरान जागेत वृक्षारोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:27 IST2021-08-27T04:27:21+5:302021-08-27T04:27:21+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क. बांबवडे : पिशवी (ता. शाहूवाडी) येथे हरित सेना व झाड फाउंडेशनच्या वतीने सृष्टी संवर्धन चळवळी अंतर्गत ...

Plantation in Guyran space at the police escort bag | पोलीस बंदोबस्तात पिशवी येथे गायरान जागेत वृक्षारोपण

पोलीस बंदोबस्तात पिशवी येथे गायरान जागेत वृक्षारोपण

लोकमत न्यूज नेटवर्क.

बांबवडे : पिशवी (ता. शाहूवाडी) येथे हरित सेना व झाड फाउंडेशनच्या वतीने सृष्टी संवर्धन चळवळी अंतर्गत वृक्षारोपण कार्यक्रम राबविण्यात आला. काही ग्रामस्थांच्या विरोधामुळे हा कार्यक्रम पोलीस बंदोबस्तात राबवण्यात आला.

पिशवी (ता. शाहूवाडी )येथील देवमाळ टेकडीवर ऑक्सिजन पार्क, पिसाई देवीच्या गायरान जागेत वृक्षारोपण करण्याचे झाड फाउंडेशनचे जालिंदर इंगवले यांनी आयोजित केले होते. या कार्यक्रमास सोशल मीडियाद्वारे वृक्षप्रेमींना उपस्थित राहण्याचे आवाहन केले होते. परंतु या जागेत काही लोकांनी अतिक्रमण केलेले असून इतर काहीजण करू इच्छितात. त्यांनी सोशल मीडियाद्वारे हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम होऊ नये यासाठी लोकांना कार्यक्रमस्थळी उपस्थित राहण्याचे आवाहन केले होते. यामुळे आयोजकांनी शाहूवाडी पोलीस व जिल्हा पोलीस दलातर्फे सैनिक सेलकडे तक्रार केली होती. त्यानुसार शाहूवाडीचे पोलीस निरीक्षक, विजय पाटील यांनी या कार्यक्रमाला संरक्षण देऊन, वृक्षारोपण कार्यक्रम सुरळीत पार पाडण्यासाठी सहकार्य केले.

या कार्यक्रमास उदयसिंहराव गायकवाड हायस्कूलचे मुख्याध्यापक कांबळे, आनंदराव इंगवले, झाड फाउंडेशनचे जालिंदर इंगवले, प्रियांका इंगवले, अजित पवार, वृक्षप्रेमी, ग्रामस्थ उपस्थित होते.

फोटो ओळी , पिशवी येथे गायरान जागेत वृक्षारोपण प्रसंगी पोलीस निरीक्षक विजय पाटील, जालिंदर इंगवले, संभाजी पाटील, प्रियांका इंगवले.

Web Title: Plantation in Guyran space at the police escort bag