शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

(नियोजनातील विषय) आधीचे ४४ टक्के टार्गेट पूर्ण : आता १८ वर्षांवरील १८ लाख तरुण लसीकरणाच्या रांगेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:23 IST

कोल्हापूर : जिल्ह्यात ४५ च्या पुढील वयोगटाचे लसीकरण सध्या सुरू असून, लोकांची मानसिकता आणि लसींच्या तुटवड्याशी सामना ...

कोल्हापूर : जिल्ह्यात ४५ च्या पुढील वयोगटाचे लसीकरण सध्या सुरू असून, लोकांची मानसिकता आणि लसींच्या तुटवड्याशी सामना करत तीन महिन्यांत ४४ टक्क्यांचा पल्ला गाठला आहे. आता केंद्र सरकारने १८ ते ४५ वयोगटातील सर्वांनाच एक मेपासून लस देण्याचे आदेश काढल्याने जिल्ह्यातील १८ लाख ५२ हजार जण लसीकरणासाठी रांगेत असणार आहेत. हा तरुणांचा वयोगट एकूण लोकसंख्येच्या ४४ टक्के इतका असल्याने लसींच्या उपलब्धतेसह केंद्रांची संख्याही आतापेक्षा दुपटीने वाढवावी लागणार आहे.

जिल्ह्यात १६ जानेवारीपासून कोविड लसीकरणास सुरुवात झाली आहे. सुरुवातील मुबलक लस उपलब्ध असतानाही भीतीपोटी कोणी घ्यायला तयार नव्हते; पण वारंवार प्रबोधन केल्यानंतर आणि कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्यानंतर लसीकरणासाठी धावाधाव सुरू झाली. लोक प्रतीक्षा करून, रांगेत उभे राहून लस टोचून घेऊ लागले. आरोग्य कर्मचारी, फ्रंट वॉरिअर्ससह ४५ ते ६० व त्यापुढील ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी लसीच्या पहिल्या टप्प्यात मोहीम राबविण्यात आली. यात आजअखेरपर्यंत हेल्थ वर्करचे १०२, तर फ्रंटलाईन वर्कर १४१ टक्के इतके उद्दिष्ट साध्य झाले असून, ४५ वयोगटावरील लसीकरण फक्त ४१ टक्केच झाले आहे.

बॉक्स ०१

एकूण लोकसंख्या : ४२ लाख ४८ हजार ४९०

१८ ते ४५ वयोगटातील लोकसंख्या : १८ लाख ५२ हजार ३३९

एकूण लोकसंख्येशी प्रमाण : ४४ टक्के

एकूण शहरी : ५ लाख ३१ हजार ३३४

एकूण ग्रामीण : १३ लाख २१ हजार ५

बॉक्स ०२

दुसऱ्या डोसचे काय

जानेवारीपासून सुरू झालेल्या लसीकरण मोहिमेत हेल्थ केअर वर्कर, फ्रंटलाईन वर्कर, ४५ ते ६० वयोगट, ६० वर्षांवरील अशा चार गटांतील १५ लाख ९१ हजार ४४९ जणांचे लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले. त्यापैकी पहिला डोस ७ लाख ५ हजार २१४ जणांनी घेतला आहे, ही टक्केवारी ४४ टक्के आहे. दुसरा डोस ५९ हजार ४८८ जणांनी घेतला असून, लसींच्या तुटवड्यामुळे हे प्रमाण ४ टक्केच राहिले आहे.

बॉक्स ०३

एक आठवड्याचा साठा

या आठवड्यासाठी जिल्ह्याला ७० हजार कोव्हिशिल्ड लसीचे डोस उपलब्ध झाले आहेत. सध्या २३८ केंद्रांवर रोज ८ ते ९ हजार डोस लागतात हे गणित धरले तर पुढील आठवडाभर ही लस पुरणार आहे.

बॉक्स ०४

ज्येष्ठही मागेच

या लसीकरणात पहिल्या टप्य्यात ६० वर्षांवरील ज्येष्ठांचा समावेश केला होता. यातील ३ लाख ४० हजार ७६७ जणांनी आतापर्यंत लसीचा पहिला डोस, तर २० हजार १५४ जणांनी दुसरा डोस घेतला आहे. हे प्रमाण एकूण लसीकरणाच्या केवळ २ टक्के आहे.

बॉक्स ०५

लसीकरण केंद्रेही वाढवावी लागणार

जिल्ह्यात सध्या २३८ केंद्रांवर लसीकरण सुरू आहे. आणखी १८ लाख तरुणांना ही लस दिली जाणार असल्याने अजून किमान २०० लसीकरण केंद्रे वाढवावी लागणार आहेत.