नियोजनातील विषय ....पंधराशेपैकी २६ चालकांकडून अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:57 IST2021-02-05T06:57:12+5:302021-02-05T06:57:12+5:30

कोल्हापूर : चालकांनी एस.टी.मधील प्रवासी म्हणजे आपले कुटुंब समजून बसवाहतूक केल्यामुळे केवळ २६ अपघात झाले आहेत. याचाच अर्थ १५०१ ...

Planning issues .... Accidents from 26 out of 15 drivers | नियोजनातील विषय ....पंधराशेपैकी २६ चालकांकडून अपघात

नियोजनातील विषय ....पंधराशेपैकी २६ चालकांकडून अपघात

कोल्हापूर : चालकांनी एस.टी.मधील प्रवासी म्हणजे आपले कुटुंब समजून बसवाहतूक केल्यामुळे केवळ २६ अपघात झाले आहेत. याचाच अर्थ १५०१ चालकांपैकी २६ जणांकडून नकळत चुका झाल्या किंवा समोरून आलेल्या वाहनाने ठोकर दिल्याने अपघात झाले आहेत.

कोल्हापूर विभागाच्या कागल, गडहिंग्लज, चंदगड, शाहूवाडी, गारगोटी, आजरा, हातकणंगले, जयसिंगपूर, राधानगरी, आदी आगारांमध्ये एकूण १५०१ चालक आहेत. गेल्या वर्षभरात या चालकांपैकी जानेवारी ते डिसेंबर २०२० अखेर २६ चालकांकडून अपघात झाले. राज्यातील इतर आगारांच्या तुलनेत ही संख्या नगण्यच आहे. चालकांचे मानसिक संतुलन चांगले राहण्यासाठी अधिकारीवर्ग सातत्याने प्रबोधन करत असतो. शारीरिकदृष्ट्या चालकांवर ताण येणार नाही, याची काळजी घेतली जाते. वेळोवेळी आरोग्य तपासणी केली जाते. त्यामुळेच वर्षभरात एकूण ७८ जणांचा विना अपघात बस चालविली म्हणून सत्कार झाला. बसेसची गती ६५ ते ७० प्रति तास इतकीच मर्यादित केली आहे. त्यामुळे महामार्ग असो अथवा घाटमार्ग त्यात चालक डोळ्यांत तेल घालून व एस. टी. बसमधील प्रवासी आपलेच कुटुंब समजून वाहन चालवितात. त्यामुळे या विभागातून अपघातांचे प्रमाण कमी आहे.

६० ते ६५ ला लाॅक तरीही अपघात

महामंडळाच्या बसेसच्या क्षमतेप्रमाणे ६० ते ६५ प्रतितास किलोमीटर वेगाला लाॅक केले आहे तरीही चालकांच्या अतिआत्मविश्वासामुळे काहीवेळा अपघात होतात. दुचाकीस्वारांच्या अचानक समोर येण्यामुळे व त्यांना चुकविताना चालकांकडून अपघात झाले आहेत. यात समोरच्या वाहनधारकाला चुकविताना समोरून येणाऱ्या दुसऱ्या वाहनाला ठोकर बसते. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे.

पाॅईंटर

- जिल्ह्यातील एस. टी. चालकांची संख्या - १५०१

विना अपघात सत्कार

२५ वर्षे सेवा झालेले - ०३

२० वर्षे सेवा झालेले - १४

१५ वर्षे सेवा झालेले -०८

१० वर्षे सेवा झालेले - ३९

५ वर्षे सेवा झालेले - १४

वर्षभरात झालेले अपघात असे,

जानेवारी २०२०- ०९

फेब्रुवारी - ०५

मार्च -०५

एप्रिल-०५

मे-०

जून ०१

जुलै-०

ऑगस्ट-०

सप्टेंबर-०१

ऑक्टोबर -०२

नोव्हेंबर-०२

डिसेंबर -०१

चालकांची मानसिक स्थिती चांगली राहण्यासाठी त्यांची वेळोवेळी आरोग्य तपासणी केली जाते. प्रत्येक चालकाची वाहतूक नियमांबद्दलचे प्रबोधन, जनजागृती केली जाते. सातत्याने वेळ आणि गतीबद्दल लेखी विचारणा चालकांना केली जाते. त्यामुळे अपघात रोखण्यास यश आले आहे.

- शिवराज जाधव, विभागीय वाहतूक अधिकारी, कोल्हापूर विभाग

कोट

प्रवासी वाहतूक करतो, याचे भान सातत्याने मनात ठेवले तर अपघात होत नाहीत. त्यामुळेच तीस वर्षे विना अपघात सेवा बजावू शकलो.

- बिरसिद्धा कट्टीकर, चालक, गडहिंग्लज आगार

कोट

सुरक्षित अंतर ठेवूनच प्रवासी वाहतूक करतो. विशेषत: अतिआत्मविश्वास अंगी बाळगत नाही त्यामुळेच २५ वर्षांपेक्षा अधिक काळ विना अपघात सेवा बजावली.

- विजय शेलार, चालक, कोल्हापूर आगार

Web Title: Planning issues .... Accidents from 26 out of 15 drivers