पेठवडगाव (कोल्हापूर) : फटाके कारखान्यात स्फोट होऊन कामगार जागीच ठार, एक गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 17:28 IST2018-02-01T17:26:24+5:302018-02-01T17:28:34+5:30
पेठवडगाव मधील भादोले रोडवरील एका फटाके कारखान्यात स्फोट होऊन एक कामगार जागीच ठार झाला, तर एक गंभीर जखमी झाला आहे. ही घटना सकाळी दहाच्या सुमारास घडली.

पेठवडगाव (कोल्हापूर) : फटाके कारखान्यात स्फोट होऊन कामगार जागीच ठार, एक गंभीर जखमी
ठळक मुद्देफटाके कारखान्यात स्फोट होऊन कामगार जागीच ठार शॉर्टसर्किटमुळे स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती
सुहास जाधव
पेठवडगाव (कोल्हापूर) : पेठवडगाव मधील भादोले रोडवरील एका फटाके कारखान्यात स्फोट होऊन एक कामगार जागीच ठार झाला, तर एक गंभीर जखमी झाला आहे. ही घटना सकाळी दहाच्या सुमारास घडली.
हमीद दस्तगिर शिकलगार यांचा हा फटाके कारखाना आहे. शॉर्टसर्किटमुळे हा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती आहे. प्रकाश शिवराम सावंत (वय ५५) हा कामगार जागीच ठार झाला आहे. शिवाजी धोंडू दबडे (वय६५) हा कामगार गंभीर जखमी आहे. त्याच्यावर सीपीआर मध्ये उपचार सुरू आहेत.
घटनास्थळी तहसीलदार वैशाली राजमाने, पोलिस निरीक्षक यशवंत गवारी, ए.टी.एस.प्रमुख आय.ए.सय्यद यांच्यासह मोठा फौजफाटा दाखल झाला. पुढील तपास सुरू आहे.