थिएटरमध्ये पद्मावत सिनेमा सुरू असताना पेट्रोल बॉम्ब फोडून केला स्फोट, लोकांची पळापळ

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2018 04:02 PM2018-01-27T16:02:50+5:302018-01-27T16:06:34+5:30

बेळगावात गुरूवारी रात्री पद्मावत सिनेमाचा शो सुरू असताना प्रकाश थिएटरच्या बाहेर काही समाजकंटकांनी पेट्रोल बॉम्ब फोडून स्फोट घडवला.

panic in theatre after petrol bomb attack outside it in karnataka people were watching padmaavat | थिएटरमध्ये पद्मावत सिनेमा सुरू असताना पेट्रोल बॉम्ब फोडून केला स्फोट, लोकांची पळापळ

थिएटरमध्ये पद्मावत सिनेमा सुरू असताना पेट्रोल बॉम्ब फोडून केला स्फोट, लोकांची पळापळ

Next

बंगळुरू- बेळगावात गुरूवारी रात्री पद्मावत सिनेमाचा शो सुरू असताना प्रकाश थिएटरच्या बाहेर काही जणांनी पेट्रोल बॉम्ब फोडून स्फोट घडवला. या स्फोटात जीवितहानी झालेली नसली तर थिएटरच्या आत असलेल्या लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. पेट्रोल बॉम्ब स्फोटाचा आवाज ऐकुन लोक थिएटरच्या बाहेर पळाले. पेट्रोल बॉम्बच्या स्फोटामुळे थिएटरच्या बाहेर मोठी आग लागली होती. दरम्यान, हा प्रकार करणाऱ्यांचा शोध पोलिसांकडून घेतला जातो आहे. पद्मावत सिनेमाला विरोध दर्शविण्यासाठी पेट्रोल बॉम्बचा स्फोट घडविण्यात आला का ? याचा तपास सुरू झाला आहे.  

गुरूवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. बाईकवरून काही जणांनी येऊन थिएटरबाहेर स्फोट केल्याचं सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसतं आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पद्मावत सिनेमाला विरोध करण्यासाठी हा प्रकार केल्याचं दिसतं आहे, असं पोलीस अधिकारी आयएच सातेनाहल्ली यांनी सांगितलं. बाईकवरून आलेल्या काही जणांकडे पेट्रोल बॉम्ब व फटाके होते. त्याच्या सहाय्याने त्यांनी स्फोट केला. स्फोटाच्या आवाजाने लोक घाबरली व त्यांनी पळापळ सुरू केली. या स्फोटात प्रेक्षकांपैकी कुणी जखमी झालं नसून स्फोटानंतर काही वेळाने सिनेमा पुन्हा सुरू करण्यात आल्या. 

दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या पद्मावर या सिनेमाला राजपूत संघटनांकडून कडवा विरोध होतो आहे. सिनेमाच्या विरोधात ठिकठिकाणी निदर्शनंही केली जातं आहेत. राजस्थानमधील करणी सेनेकडून सिनेमाला तीव्र विरोध होत असून करणी सेना व त्यांच्या विविध शाखांवर हिंसक प्रदर्शन केल्याचा आरोप आहे. करणी सेनेच्या कडव्या विरोधानंतरही सिनेमा प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद सिनेमाला मिळतो आहे. 
 

Web Title: panic in theatre after petrol bomb attack outside it in karnataka people were watching padmaavat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.