Kolhapur Crime: मॉडर्न फॅशनचे कपडे, मेकअप अन् कॅट वॉक कर म्हणत विवाहितेस मारहाण; अनेक वेळा दारुही पाजली
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2023 18:18 IST2023-04-13T18:17:40+5:302023-04-13T18:18:12+5:30
मानसिक व शारीरिक छळ केल्याप्रकरणी पतीसह सहा जणांविरोधात पोलिसात गुन्हा दाखल

Kolhapur Crime: मॉडर्न फॅशनचे कपडे, मेकअप अन् कॅट वॉक कर म्हणत विवाहितेस मारहाण; अनेक वेळा दारुही पाजली
गांधीनगर : उचगाव ता. करवीर येथे विवाहितेला घरातील कामावरून घालूनपाडून बोलून मॉडर्न फॅशनचे कपडे व मेकअप कर तसेच माहेरहून गाडीसाठी पैशाचा तगादा लावून तिचा मानसिक व शारीरिक छळ केल्याप्रकरणी पतीसह सहा जणांविरोधात गांधीनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत राधिका रोहित पोवार (वय ३१, रा. मेन रोड, उचगांव, ता. करवीर, सध्या रा. साई मंदिराजवळ, कळंबा, कोल्हापूर) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. या प्रकरणी पती रोहित तुषार पोवार, सासू भारती तुषार पोवार, सासरे तुषार सीताराम पोवार, नणंद शिवानी तुषार पोवार, पतीचे मामा राजेंद्र पाटील, पतीची मामी कविता राजेंद्र पाटील (रा. मेन रोड उचगांव, ता. करवीर) यांच्याविरोधात गुन्हा नोंद झाला आहे.
तक्रारीत वरील सहा जणांनी कॅट वॉक कर, असे म्हणून फिर्यादीवर जबरदस्ती करून मानसिक व शारीरिक छळ केला. घरातील मिळेल त्या वस्तूने फेकून मारहाण करून, दारू पिवून शिवीगाळ व मारहाण करून जबरदस्तीने पाच ते सहा वेळेला दारू पाजली. माहेरहून चार चाकी गाडीसाठी २० लाख रुपये घेऊन ये तसेच सर्व कपडे व आई, वडिलांनी लग्नामध्ये घातलेले २५ तोळे दागिने काढून घेतले. घरातून बाहेर हाकलून काढले, असे नमूद केले आहे. याबाबत गांधीनगर पोलिसांत नोंद झाली असून, अधिक तपास पोलिस नाईक कांबळे करीत आहेत.