शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत 'फिदायिन' हल्ला?; लाल किल्ल्याजवळ स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर
2
पकडले जाण्याच्या भीतीने उमरने उडवली स्फोटकांनी भरलेली कार; पुलवामा हल्ल्याच्या दिवशी विकली गाडी
3
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
4
आजचे राशीभविष्य, ११ नोव्हेंबर २०२५: कामे नक्की पूर्ण होतील, पण 'या' राशीने आळस टाळा !
5
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार
6
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
7
दिल्लीत स्फोट; मुंबईत अलर्ट, मुंबईच्या पाचही प्रवेशद्वारांसह सागरी सुरक्षेत वाढ; रेल्वे स्थानके, महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी
8
ना स्फोटाच्या ठिकाणी खड्डा, ना मृतांच्या शरीरात सापडले तारा आणि खिळे, या कारणांनी गुढ वाढवलं
9
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
10
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती चिंताजनक, ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
11
देशातील ७०% कैदी अजूनही दोषी नाहीत, केवळ ८% जणांनाच मिळाली कायदेशीर मदत
12
व्हिडीओत संपादनात चूक, दिशाभूल केल्याचा ठपका, बीबीसीचे प्रमुख संचालक, वृत्त प्रमुखांचा राजीनामा
13
पासवर्ड बदला, अन्यथा डल्ला, ७६ लाख लोकांचा आहे एकच पासवर्ड; पासवर्ड चोरल्यास बसू शकतो फटका
14
निवड समितीसोबतचा पंगा मोहम्मद शमीला भोवणार? कसोटी संघातील पुनरागमन अनिश्चित काळ लांबणीवर जाण्याची शक्यता
15
कंपनीला कर्मचाऱ्यांनीच घातला दीड कोटीचा गंडा, बनावट कॅश व्हाऊचरची छपाई, अतिरिक्त पगार
16
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
17
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
18
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
19
लाल किल्याजवळील स्फोटाने देश हादरला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमित शाह यांना फोन, पोस्ट करत म्हणाले-
20
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल

फिनिक्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 00:25 IST

महाद्वार रोडने जात असताना अचानक एक स्कूटर माझ्याजवळ येऊन थांबली. ‘काकू, काकू, प्लीज थांबा ना.’ तोंडाला स्कार्फ गुंडाळलेल्या एका ...

महाद्वार रोडने जात असताना अचानक एक स्कूटर माझ्याजवळ येऊन थांबली. ‘काकू, काकू, प्लीज थांबा ना.’ तोंडाला स्कार्फ गुंडाळलेल्या एका गॉगलधारी तरुणीनं मला थांबवलं. ‘ओळखलंत का मला?’ तिचा बुरखा हटवत तिनं मला विचारलं. मी तिच्या चेहऱ्याकडं पाहिलं आणि आश्चर्यचकित होऊन तिला म्हटलं, ‘सुवर्णा तू?’ तिने अत्यानंदाने भररस्त्यात मला मिठीच मारली. तिला किती बोलू, किती नको असं झालं होतं म्हणून जवळच्याच हॉटेलमध्ये आम्ही शिरलो. तिने माझी आवड लक्षात ठेवून वेटरला सहज आॅर्डर दिली. अधून-मधून वाजणाºया मोबाईलवर ती इंग्रजीतून लीलया संवाद साधत होती. मी तिचं निरीक्षण करत होते. मला आठवत होती पाच-सहा वर्षांपूर्वीची सुवर्णा...बेताची आर्थिक परिस्थिती असलेलं आई-वडील, दोन मुली असं हे कुटुंब आमच्या शेजारी राहायला आलं होतं. अर्धांगवायूनं अंथरुणाला खिळलेले वडील. स्वभावानं तापट-हेकेखोर, कदाचित परिस्थितीमुळं हतबल झाले असावेत; पण बायको-मुलींशी सतत अर्वाच्य भाषेत बोलायचे. आई-मुली नेहमी दडपणाखाली असायच्या. आर्थिक परिस्थितीबरोबर मानसिक दबावामुळे सारे घर शरीर प्रकृतीनेही नाजूक बनलं होतं. गॅलरीत कधीतरी कपडे सुकवण्याच्या निमित्तानं नुसतं हसणं, एखाद्या शब्दाची देवघेव असं करत आमचा परिचय झाला. घट्ट झाकलेलं संपर्काचं दार हळूहळू किलकिलं व्हायला लागलं. सुवर्णा आणि तिची बहीण माझ्याशी चक्क हसून बोलायला लागल्या.त्यांच्या बोलण्यातून सुवर्णा बी.कॉम. फर्स्ट क्लास, तर तिची बहीण एम.एस्सी. फर्स्ट क्लास असल्याचं समजलं. मी त्यांना नोकरीविषयी विचारलं, तर मोठ्या बहिणीने नोकरीच्या निमित्ताने बाहेर पडून परधर्मातील मुलाशी लग्न केले. त्याचा वडिलांना त्रास झाल्याने या दोघींच्या नोकरी करण्याला त्यांचा पूर्ण विरोध होता. स्वेटर शिकण्याच्या निमित्ताने सुवर्णा माझ्याकडे यायला लागली.कोणत्याही गोष्टीला ठाम नकार हे तिच्या स्वभावाचं वैशिष्ट्य. एखादा पदार्थ खायला दिला तर तो तिला कसा अपायकारक आहे, याचीच चर्चा व्हायची. परिस्थितीमुळं बाबांकडील नातेवाइकांची बोलणी ऐकावी लागायची. केवळ मामाचा आधार होता. ती माझ्याकडे आली की, तिच्या मनावर हळूवार फुंकर घालायचं काम मी हाती घेतलं. अगदी साध्या साध्या गोष्टींतून शिकवणी सुरू झाली. प्रत्येक गोष्टीतील तिची स्वत:विषयीची नकारात्मक भूमिका मला खोडून टाकायची होती. तिचा काही खायचा नकार घालविण्यासाठी सुचवलं, तू डिशभर खाऊ नकोस, पण चमचाभर पदार्थ खाऊन त्याची पावती दिलीस तर तुला त्रास होणार नाहीच; पण समोरचा माणूस आनंदी होईल. तुझ्याविषयी त्यांचे मत बदलेल, नकारात्मक भूमिका नाहीशी होईल. हळूहळू तिच्यात सकारात्मक बदल घडू लागला. आत्याशी बोलून बाबांकडून नोकरीची परवानगी मिळविली. अनेक स्पर्धा परीक्षा दिल्या.आमच्या ओळखीच्या सीएकडे तिच्यासाठी शब्द टाकला. त्यांना तिच्याविषयी कल्पना दिली. तिची नोकरी सुरू झाली. बाहेरची कामे करण्यासाठी स्कूटर शिकली. पुणे शहरात कुठंही स्कूटरवरून सहज फिरू लागली. तिच्या कामाची धडाडी पाहून तिच्या सरांनी स्वत:ची मुलगी समजून तिला घडवलं. तिच्या प्रगतीचा आलेख उंचावत होता. बदलीच्या निमित्तानं आम्ही पुणं सोडलं, तेव्हापासून तिची काहीच खबरबात नव्हती.आज या सुरवंटाचं फुलपाखरू झालेलं मी पाहिलं. आॅडिटच्या कामानिमित्त ती कोल्हापुरला आली होती. आम्ही दोघी अंबाबाईचं दर्शन घ्यायला गेलो. सुवर्णाला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आणि निरोप घेतला.मी कुणी समुपदेशक नाही. मी सामान्य गृहिणी. माझ्या नकळत केलेल्या सकारात्मक प्रयत्नांचं हे फलित. आज मन फक्त आनंदानं काठोकाठ भरून राहिलं आहे.स्नेहल कुलकर्णी