शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
4
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
5
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
6
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
7
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
8
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
9
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
10
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
11
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
12
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
13
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
14
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
15
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
16
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
17
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
18
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
19
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
20
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur ZP Election 2026: शिंदेसेनेच्या कापशी उमेदवाराविरोधात सर्किट बेंचमध्ये याचिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2026 12:19 IST

तरीही निवडणूक निर्णय अधिकारी यांनी त्यांचे नामनिर्देशनपत्र स्वीकारले असून ते मंजूरही केले आहे.

कोल्हापूर : शिंदेसेनेच्या कागल तालुक्यातील कापशी जिल्हा परिषद मतदारसंघातील उमेदवार अश्विनी मकरंद कोळी यांच्याविरोधात अश्विनी परशराम तावरे यांनी येथील सर्किट बेंचमध्ये सोमवारी याचिका दाखल केली आहे.याचिकेत म्हटले आहे की अश्विनी कोळी या शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूर या संस्थेच्या मुरगुड विद्यालयात सहायक शिक्षिका आहेत. त्या शिंदेसेनेकडून कापशी मतदारसंघातून जिल्हा परिषदेची निवडणूक लढवत आहेत. त्यांना शासकीय निधीतून दर महिन्याला वेतन अदा करण्यात येते. त्यामुळे त्यांनी शासकीय कर्मचाऱ्यांसाठी लागू असलेल्या नियमानुसार आधी राजीनामा देऊन मग जिल्हा परिषदेसाठी आपले नामनिर्देशनपत्र दाखल करणे आवश्यक होते. 

परंतु, तसा राजीनामा त्यांनी दिलेला नाही. तरीही निवडणूक निर्णय अधिकारी यांनी त्यांचे नामनिर्देशनपत्र स्वीकारले असून ते मंजूरही केले आहे. त्यामुळे त्यांचे नामनिर्देशनपत्र रद्द करावे अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. अश्विनी तावरे यांनी राज्य निवडणूक आयोग, निवडणूक निर्णय अधिकारी, महाराष्ट्र शासन, अश्विनी कोळी यांच्यासह या मतदारसंघातील अन्य दोन उमेदवारांना प्रतिवादी केले आहे.

टॅग्स :Zilla Parishad Electionजिल्हा परिषद निवडणूक २०२६kolhapurकोल्हापूरZP Electionमहाराष्ट्र जिल्हा परिषद निवडणूक निकाल २०२५Shiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेCourtन्यायालय