शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

पट्टणकोडोलीत खासगी सावकारीच्या धाकाने आत्महत्या?

By admin | Updated: December 29, 2014 00:06 IST

कारवाईची मागणी : पोलिसांचा कानाडोळा, दंडुकशाहीने अव्वाच्या सव्वा व्याज आकारणी

बालेचॉँद हेरवाडे - पट्टणकोडोली  परिसरात खासगी सावकारी मोठ्या प्रमाणात फोफावली असून, सावकारांच्या व्याज व कर्जाच्या तगाद्याला कंटाळून अनेकजण आत्महत्येचा मार्ग अवलंबत आहेत. त्यामुळे अनेकांचे संसार देशोधडीला लागले असून, दिवसेंदिवस सावकारीचा फास वाढतच आहे. करवीर तालुक्यातील वसगडे येथून पैसा पुरवून त्या त्या गावातील काही युवकांच्या माध्यमातून ही सावकारकीची चेन चालवली जाते. यामध्ये काही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांबरोबरच चांदी उद्योजक व पतसंस्थाही कार्यरत आहेत. मात्र, अवैध सावकारकीकडे पोलिसांनी कानाडोळा केला असल्याने खासगी सावकारांकडून दंडुकशाहीचा वापर करून अव्वाच्या सव्वा व्याज आकारणी केली जात आहे.पट्टणकोडोलीसह हुपरी, तळंदगे, इंगळी आणि रेंदाळ या गावांमध्ये खासगी सावकारकी करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. आठवडा भिशी, हप्ता भिशी, कार्ड भिशी, तसेच वैयक्तिक माध्यमातून कर्जदारांना कर्ज पुरवून हा व्यवसाय चालवला जात आहे. कर्जदारांच्या गरजेनुसार कर्जावरील व्याज आकारणीचा टक्का घेतला जात असल्याने १० ते १५ टक्क्यांपर्यंत व्याज आकारणीचा धडाका येथील सावकारांनी सुरू केला आहे. वसगडे येथील काही परवानाधारक सावकार जादा व्याज मिळविण्याच्या हेतूने त्या त्या गावामध्ये एक युवक वर्गाची फळीच तयार करत आहेत. वरकमाईच्या माध्यमातून मिळणाऱ्या पैशाच्या हव्यासापोटी हे युवक सावकारी व्याजाचा टक्का वाढवत आहेत. त्यामुळे पूर्वीच आर्थिक संकटात सापडलेल्या लोकांना हे व्याज परतफेड करणे जमत नसल्याने हा वाढीव टक्काच त्यांच्या जिवावर बेतत आहे.संबंधित कर्जदाराला कर्ज देताना घर, शेती लिहून तसेच कोरे स्टॅम्प, चेक घेऊन कर्ज दिले जाते. कर्जावरील व्याज आकारणी पठाणी स्वरूपाची असल्याने काही महिन्यातच व्याजाची रक्कम दुप्पट होते. त्यामुळे कर्जदाराला व्याज व कर्ज परतफेड करणे अशक्य बनते. त्यामुळे लिहून घेतलेल्या कागदपत्रांच्या जोरावर सावकारांकडून दंडुकशाहीचा वापर करून त्यांची मालमत्ता हडप करण्याचा प्रकार परिसरात मोठ्या प्रमाणात घडत आहे. यातूनच काहीवेळा सावकारांकडून कर्जदारास मारहाण करण्याचा प्रकार घडत आहे. यातूनच कर्जदारास मारहाण करण्याचा प्रकार घडत आहे. कर्जदारांकडून पोलिसांकडे दाद मागितली असता केवळ पोलिसांकडून त्यांच्यावर नाममात्र कारवाई करून प्रकरणावर पडदा पाडण्याचे काम होत आहे. त्यामुळे अशा सावकारीचे धाडस आणखीनच वाढत आहे.कर्जाला कंटाळून पट्टणकोडोली येथील एका महिलेने आठ दिवसांपूर्वीच विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली होती; तर खासगी सावकारांच्या त्रासाला कंटाळून येथील एका दाम्पत्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे. त्यामुळे खासगी सावकारांची दहशत वाढली असल्याची चर्चा सुरू आहे.बड्या चांदी उद्योजकांपासून पक्षाच्या पदाधिकाऱ्यांपर्यंत अनेक लोक या सावकारीत गुंतले आहेत. त्यामुळे काहीवेळा कर्जदार गप्प बसत असल्याने त्यांची मालमत्ता सावकारांकडून काढून घेतली जात आहे. त्यामुळे आपली जीवन यात्रा संपवण्याचा मार्ग अनेकजण अवलंबत आहेत. गावातीलच एका पतसंस्थेच्या माध्यमातूनही ही खासगी सावकारकी मोठ्या प्रमाणात चालविली जात आहे. त्यामुळे वाढत्या खासगी सावकारकीला आळा घालून अशा सावकारांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी होत आहे.