शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
2
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
3
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
4
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
5
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
6
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
7
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
8
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
9
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
10
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
11
मूठभरांमुळे मराठा समाजाला आरक्षण नाकारणे अयोग्य; राज्य सरकारचा हायकोर्टात युक्तिवाद
12
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
13
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
14
अत्यंत धोकादायक! पाकमध्ये फुग्यात गॅस भरून होतोय स्वयंपाक; हा प्रकार म्हणजे चालता-फिरता बॉम्ब
15
१० पायऱ्या चढायला ४० वर्षे लागतात, तेव्हा...; विधान परिषदेसाठी भाजपानं 'यांनाच' संधी का दिली?
16
शनिवारी, रविवारी मध्यरात्री मेगाब्लॉक; मध्य रेल्वे सेवा पूर्णत: बंद राहणार, मेल-एक्स्प्रेसना फटका
17
इराणची नाकेबंदी सुरूच, ट्रम्प यांचा 'नवा प्लॅन'; संघर्ष पुन्हा चिघळण्याची चिन्हे
18
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
19
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
20
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
Daily Top 2Weekly Top 5

उदगावच्या युवकाचा अलाहाबादमध्ये छळ

By admin | Updated: January 24, 2015 00:08 IST

नातेवाइकांकडूनच मारहाण : अंगावर अ‍ॅसिड टाकण्याचा प्रकार उघडकीस

जयसिंगपूर : शिरोळ तालुक्यातील उदगाव येथील १६ वर्षीय युवकाला नातेवाइकांनी अलाहाबाद (उत्तर प्रदेश) येथे कामाला नेऊन कामात चूक झाल्यास अंगावर अ‍ॅसिड टाकून मारहाण करून छळ केल्याची घटना आज, शुक्रवारी उघडकीस आली. सूरज बंडू गायकवाड (रा. उदगाव, ता. शिरोळ) असे युवकाचे नाव आहे. या घटनेमुळे उदगावमध्ये खळबळ उडाली आहे.उदगाव येथे गायकवाड यांच्या कुटुंबात सूरजची आई सुवर्णा, भाऊ राजेंद्र असा परिवार आहे; तर दोन वर्षापूर्वी वडील बंडू गायकवाड यांचे निधन झाले आहे. घरची परिस्थिती बेताची असल्याने कुटुंबापुढे उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा राहिल्याने भाऊ राजेंद्र मिळेल ते काम करतो. गायकवाड यांचे अलाहाबाद येथे नातेवाईक आहेत. त्यांचा सोन्या-चांदीचा व्यवसाय आहे. या व्यवसायात काम करण्यासाठी त्यांनी दीड वर्षापूर्वी सूरजला नेले होते. त्याठिकाणी दिवसभर सोन्या-चांदीच्या आटणीवर सूरज काम करीत होता. दरम्यान, दीड वर्षाच्या कालावधीमध्ये राजेंद्र अलाहाबादला फोन करायचा. मात्र, नातेवाईक सर्वकाही व्यवस्थित असल्याचे सांगत असत. त्यामुळे सूरजची खरी वस्तुस्थिती घरच्यांना समजून येत नव्हती. या काळात त्याला काठीने मारहाण, एवढेच नव्हे तर अंगावर अ‍ॅसिड टाकले जात होते. वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून झाडू आणण्यासाठी म्हणून तो घराबाहेर पडला, तो थेट आज सकाळी उदगावमध्ये पोहोचला आणि झालेला प्रकार त्याने घरच्यांना कथन केला. (प्रतिनिधी)