शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
3
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
5
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
6
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
7
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
8
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
9
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
10
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
11
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
12
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
13
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
15
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
16
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
17
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
18
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
19
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
20
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
Daily Top 2Weekly Top 5

समाजाच्या मानसिकतेवर अचूक बोट

By admin | Updated: December 17, 2015 01:39 IST

राज्य बालनाट्य स्पर्धेचा समारोप : प्रेक्षकांची खचाखच गर्दी; ‘काही क्षण‘ने सूप वाजले

कोल्हापूर : बालनाट्य स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी चिमुरड्यांनी विविध बालनाट्यांतून सामाजिक संदेश दिले. शेवटच्या दिवशीही प्रेक्षकांनी गर्दी केली होती. दामले विद्यालय, रत्नागिरीतर्फे सादर झालेल्या ‘काही क्षण’ या नाटकाने १३ व्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेचा समारोप करण्यात आला.‘झाडवाली झुंबी’ या नाटकाने बुधवारी, चौथ्या दिवसाची सुरुवात झाली. शिंदे अकॅडमी, कोल्हापूर यांनी सादर केलेल्या या नाटकामध्ये, निसर्गरक्षण व पर्यावरण रक्षण या विषयाची मांडणी करीत निसर्ग आणि मानव यांच्या नातेसंबंधांवर प्रकाश टाकला. ‘प्लॉट नंबर शून्य कचराकुंडीजवळ,’ अक्षरसिंधू साहित्य कलामंच, कणकवली या संस्थेने नाटकाच्या माध्यमातून समाजातील अनाथ मुलांची परिस्थिती व समाजाचा दृष्टिकोन मुलांनी मांडला.‘रानपाखरं’ या अण्णा भाऊ इंग्लिश स्कूल, आजरा शाळेच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नाटकाच्या माध्यमातून शिक्षणासोबतच मूल्यशिक्षणही आजच्या काळात किती गरजेचे आहे, ते पटवून देण्याचा प्रयत्न केला. आनंदसागर पब्लिक स्कू ल, तासगावने सादर केलेल्या ‘तिसरी घंटा’ या नाटकाच्या माध्यमातून, नाटकांकडे प्रेक्षकांचा ओढा कमी झाल्याने बंद पडलेल्या थिएटरच्या वाट्याला आलेल्या उपेक्षेचे आणि त्याला आलेल्या एकाकीपणावर भाष्य केले. आजरा हायस्कूल, आजराच्या मुलांनी सादर केलेल्या ‘मनू माझा भावला’ या नाटकातून ग्रामीण-शहरी मानसिकतेमधील फरकांमुळे खेड्यातील मुलांना होणारा त्रास मांडला आहे. आदर्श गुरुकुल विद्यालय, पेठवडगाव या शाळेच्या मुलांच्या ‘केल्याने होत आहे रे’ या वगनाटकाच्या माध्यमातून मुलांच्या मनात असलेली अभ्यासाची भीती कमी करून हसत-खेळत शिक्षणाचा मूलमंत्र दिला. दामले विद्यालय, रत्नागिरीच्या मुलांनी सादर केलेल्याा ‘काही क्षण’ या नाटकाच्या माध्यमातून अनाथ मुले परिस्थितीशी झगडत कशी उभी राहतात, दु:खाच्या क्षणांतही आनंदाचे ‘काही क्षण’ मिळवून जगण्याचा अविरत संघर्ष कशी करतात, याचे दर्शन घडते.