सौदत्ती रेणुका मंदिर देवस्थान समितीवर पाटील यांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:28 IST2021-09-06T04:28:55+5:302021-09-06T04:28:55+5:30

कोल्हापूर : सौंदत्ती रेणुका मंदिर देवस्थान समितीवर कोल्हापूर जिल्हा रेणुका भक्त संघटनेचे प्रतिनिधी म्हणून संघटनेचे विद्यमान अध्यक्ष आनंदराव पाटील ...

Patil elected to Saudatti Renuka Mandir Devasthan Samiti | सौदत्ती रेणुका मंदिर देवस्थान समितीवर पाटील यांची निवड

सौदत्ती रेणुका मंदिर देवस्थान समितीवर पाटील यांची निवड

कोल्हापूर : सौंदत्ती रेणुका मंदिर देवस्थान समितीवर कोल्हापूर जिल्हा रेणुका भक्त संघटनेचे प्रतिनिधी म्हणून संघटनेचे विद्यमान अध्यक्ष आनंदराव पाटील यांची निवड करण्यात आली. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले कर्नाटकातील सौदत्ती येथील रेणुका यात्रेसाठी कोल्हापुरातून हजारो भक्त जातात. या भक्तांसाठी सोयीसुविधा मिळाव्यात याकरिता कोल्हापूर जिल्हा रेणुका भक्त संघटनेच्या वतीने दोन सदस्य देवस्थान समितीवर घ्यावेत, अशी मागणी सातत्याने करण्यात आली होती. त्यानुसार सौदत्ती रेणुका मंदिर समितीने एक प्रतिनिधी घेण्याचे लेखी पत्र संघटनेस पाठविले आहे. त्यानुसार विद्यमान अध्यक्ष पाटील यांची शनिवारी (दि.४) हरिमंदिर, दुधाळी येथील संघटनेच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत करण्यात आली. यावेळी उपाध्यक्ष मोहन साळोखे, कार्याध्यक्ष दीपक जाधव, सरचिटणीस तानाजी चव्हाण, खजानीस आनंदराव ग. पाटील, संस्थापक सदस्य अशोकराव जाधव, सुभाष जाधव, अच्युत साळोखे, सहचिटणीस दयानंद घबाडे, रमेश बनसोडे, युवराज मोळे, लता सोमवंशी आदींची उपस्थिती होती.

फोटो : ०५०९२०२१-कोल-आनंदराव पाटील

Web Title: Patil elected to Saudatti Renuka Mandir Devasthan Samiti