शहरं
Join us  
Trending Stories
1
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शारीरीक संबंध बनवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
2
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
3
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
4
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
5
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
6
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
7
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
8
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
9
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
10
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
11
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
12
रोज खेळायची, मोबाईल पाहायची... १०वीच्या टॉपरने सांगितले कसे मिळाले ५०० पैकी ४९९ गुण?
13
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
14
Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी
15
Mental Health: तुला OCD आहे का?' – असं कोणालाही गमतीने म्हणण्यापूर्वी हा लेख नक्की वाचा!
16
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
17
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
18
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
19
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
20
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

पाटील, काटेंसह चौघे स्वीकृत संचालक

By admin | Updated: August 12, 2015 00:34 IST

बाजार समितीचे राजकारण : चंद्रकांतदादा पाटील यांचे ‘पणन’ला आदेश

कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीचे शासननियुक्त ‘स्वीकृत संचालक’ म्हणून भाजपचे जिल्हा सरचिटणीस नाथाजी पाटील (भुदरगड), स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे (कोल्हापूर), अ‍ॅड. किरण पाटील (कोल्हापूर) व चार्टर्ड अकौंटंट पी. ए. साने (कोल्हापूर) यांची निवड करण्यात आली. पणनमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी पणन संचालकांना चौघांच्या नियुक्तीचे आदेश दिले आहेत. सत्तारूढ राष्ट्रवादी-जनसुराज्यच्या कारभारावर चौघे अंकुश ठेवणार आहेत. कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाची निवडणूक महिन्यापूर्वी झाली. राष्ट्रवादी काँग्रेस-जनसुराज्य-सतेज पाटील गट, काँग्रेस व शिवसेना-भाजप अशा तिरंगी झालेल्या लढतीत राष्ट्रवादी-जनसुराज्य आघाडीने १९ पैकी १५ जागा जिंकत वर्चस्व कायम राखले. शिवसेना-भाजप आघाडीला तीन जागा मिळाल्या, तर नंदकुमार वळंजू यांनी अपक्ष म्हणून बाजी मारली.बाजार समितीच्या कारभारावर अंकुश ठेवण्यासाठी तज्ज्ञ संचालक नेमण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार पाच कोटींपेक्षा कमी उलाढाल आहे तिथे दोन, तर पाच कोटींपेक्षा जास्त उलाढाल असलेल्या बाजार समितीत चार ‘स्वीकृत सदस्य’ नेमण्यात येणार आहेत. त्यानुसार सहकार व पणनमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांची वर्णी तिथे लावली आहे. भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते नाथाजी पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे भगवान काटे, यांच्यासह अ‍ॅड. किरण पाटील व पी. एस. साने यांची ‘स्वीकृत सदस्य’ म्हणून वर्णी लावली. नाथाजी पाटील व भगवान काटे बाजार समितीच्या निवडणुकीत पराभूत झाले होते. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी वरील चौघांच्या नियुक्तीचे आदेश पणन संचालकांना दिले आहेत. येत्या दोन-तीन दिवसांत संबंधितांना नियुक्तीचे आदेश प्राप्त होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)राष्ट्रवादीचे मनसुबे उधळले !ग्रामपंचायत गटातून विजय आबिटकर व शहाजीराव वारके यांचा झालेला पराभव माजी आमदार के. पी. पाटील यांच्या जिव्हारी लागला होता. त्यामुळे दोघांना ‘स्वीकृत संचालक’ म्हणून घेण्याचे आश्वासन राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दिले होते. इतर इच्छुकही गुडघ्याला बाशिंग बांधून बसले होते; पण शासनाने थेट नियुक्त्या केल्याने सत्ताधाऱ्यांचे मनसुबे उधळले आहेत.