शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
5
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
6
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
7
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
8
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
9
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
10
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
11
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
12
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
13
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
14
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
15
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
16
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
17
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
18
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
19
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
20
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'

चाकूचा धाक दाखवून सांगलीतील प्रवाशास कोल्हापूरात लुबाडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2019 4:09 PM

  लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर : मोटारीतून लिफ्ट देण्याच्या निमीत्याने सांगलीतील एकास चाकूचा धाक दाखवून लुटल्याची घटना रविवारी पहाटे ...

ठळक मुद्देमोटारीतून लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लुबाडले तावडे हॉटेल नजीक घटना : ४१ हजाराचा मुद्देमाल लंपास

 

लोकमत न्यूज नेटवर्क,कोल्हापूर : मोटारीतून लिफ्ट देण्याच्या निमीत्याने सांगलीतील एकास चाकूचा धाक दाखवून लुटल्याची घटना रविवारी पहाटे कोल्हापूरात तावडे हॉटेल चौकात घडली. याप्रकरणी अमोल विष्णू खंडागळे (वय ३४ रा. ए १, पृथ्वी सहनिवास अपार्टमेंट, पत्रकार नगर सांगली) असे लुबाडलेल्या व्यक्तीचे नाव आहे, त्यांनी शाहुपूरी पोलीस ठाण्यात अज्ञात चौघाविरोधात तक्रार दाखल केली आहे.मोटारीतील चालकांसह चौघांनी खंडागळे यांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडून सोन्याच्या दोन अंगठ्या, मोबाईल हॅडसेट, हातातील घड्याळ, एटीएम कार्ड, ड्रायव्हींग लायसन्स, स्मार्ट कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड, क्रेडीट कार्ड, सिमन्स पीएलसी सॉफ्टवेअर ३ सिडीज असा सुमारे ४१ हजार रुपयांचा मुद्देमाल लुबाडला.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, अमोल खंडागळे हे पुण्यात नोकरीस आहेत. ते आपल्या मुळ गावी सांगली येथे जात असताना रविवारी पहाटे कोल्हापूरात आले. त्यावेळी ते तावडे हॉटेलनजीक उतरले. त्यावेळी तावडे हॉटल चौकातील बसथांब्यावर ते थांबले होते, त्यावेळी एका पांढऱ्या रंगाच्या खासगी मोटारीने त्यांना सांगलीला जाण्यासाठी लिफ्ट दिली. पुढे महामार्गावर पंचगंगा पूलाच्या अलीकडे आणखी तीन लोक मोटारीत बसले. मोटार पुढे पूलानजीक गेल्यावर मुख्य मार्गावर कडेला मोटार थांबविली. मोटारीतील चौघांपैकी एकाने खंडागळे यांच्या पोटाला चाकू लावून त्यांच्या बोटातील सोन्याच्या दोन्ही अंगठ्या, घड्याळ, मोबाईल, रोख दोन हजार रुपये तसेच बॅगमधील साहित्य काढून घेतले.त्यानंतर महामार्गावर काहीवेळ मोटर फिरवत खंडागळे यांना हालोंडीनजीक रस्त्यावर सोडले. त्यानंतर मोटार पुन्हा निघून गेली. याबाबत खंडागळे यांनी लुबाडणूक केल्याची तक्रार सोमवारी सकाळी शाहुपूरी पोलीस ठाण्यात दिली असून अज्ञात चौघांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.---------------तानाजी

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर