मोबाईलवर चॅटिंग का करतोस विचारत युवकास बेदम मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 18:37 IST2020-12-14T18:32:20+5:302020-12-14T18:37:09+5:30

Mobile , Crimenews, Police, kolhapur मोबाईलवर चॅटिंग का करतोस, या कारणावरून युवकास काठीने व लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण करण्याची घटना घडली. प्रशांत सदाशिव पाटील (वय २०, रा. बोलोली, ता. करवीर) असे मारहाणीत जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे. ही घटना पासार्डे (ता. करवीर) धरणावर घडली. याप्रकरणी चौघांवर करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Passarde was called to the dam and the youth of Bololi was beaten to death | मोबाईलवर चॅटिंग का करतोस विचारत युवकास बेदम मारहाण

मोबाईलवर चॅटिंग का करतोस विचारत युवकास बेदम मारहाण

ठळक मुद्देपासार्डे धरणावर बोलावून बोलोलीच्या युवकास बेदम मारहाणखाटांगळे येथील चौघांवर गुन्हा

 कोल्हापूर : मोबाईलवर चॅटिंग का करतोस, या कारणावरून युवकास काठीने व लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण करण्याची घटना घडली. प्रशांत सदाशिव पाटील (वय २०, रा. बोलोली, ता. करवीर) असे मारहाणीत जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे. ही घटना पासार्डे (ता. करवीर) धरणावर घडली. याप्रकरणी चौघांवर करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, जयदीप कृष्णात पाटील याने प्रशांत पाटील याला मोबाईलवर फोन करून पासार्डे धरणावर बोलावून घेतले. त्यावेळी मोबाईलवर चॅटिंग का करतोस, विचित्र मेसेज का पाठवतोस, असा जाब विचारुन चौघांनी प्रशांतला काठी, लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली.

ही घटना शनिवारी दुपारी घडली. त्यानंतर रविवारी प्रशांतला उलट्या होऊन चक्कर येऊ लागल्याने त्याला तातडीने राजारामपुरीतील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. याप्रकरणी पोलिसात जयदीप पाटील, कृष्णात पाटील, सचिन दिनकर आरडे, हृषिकेश पाटील या चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे.

Web Title: Passarde was called to the dam and the youth of Bololi was beaten to death