Kolhapur: भोंदूबाबा रोख रक्कमेसह ३५ तोळे सोने घेऊन पसार झाला, पनवेल पोलिसांनी हुपरीत जेरबंद केला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 18:39 IST2025-08-05T18:39:10+5:302025-08-05T18:39:30+5:30

घटनेने पंचक्रोशीतील खळबळ उडाली

Panvel police arrested a fraudster who fled with 35 tolas of gold along with cash in Hupri | Kolhapur: भोंदूबाबा रोख रक्कमेसह ३५ तोळे सोने घेऊन पसार झाला, पनवेल पोलिसांनी हुपरीत जेरबंद केला

Kolhapur: भोंदूबाबा रोख रक्कमेसह ३५ तोळे सोने घेऊन पसार झाला, पनवेल पोलिसांनी हुपरीत जेरबंद केला

हुपरी : भोंदूगिरी करून चारशे ग्रॅम सोन्याची विक्री केल्याप्रकरणी पोलिस पथकाने विविध ज्वेलर्स व व्यापारी वर्गाकडून तब्बल ३५ तोळे सोने व डाॅक्टर नामक व्यक्तींकडून ५ लाख रुपये हस्तगत केले आहेत. या घटनेने पंचक्रोशीतील खळबळ उडाली असून पनवेलपोलिस पथकाने हुपरी पोलिसांच्या सहकार्याने ही कारवाई केली आहे.

पाेलिसांकडून मिळालेली माहिती अशी-अघोरी पूजा विधीच्या नावाखाली तौफिक मुजावर या भोंदूबाबाने पाटील कुटुंबाच्या अंधश्रद्धेचा फायदा घेत कपड्यात गुंडाळून पाच लाख रुपये व चारशे ग्रॅम सोने घेऊन पसार झाला होता. या कालावधीत स्वामी बाबा परत न आल्यामुळे प्रवीण पाटील या शेतकऱ्याने पनवेल शहर पोलिस ठाण्यात आरोपी तौफिक फकरुद्दीन मुजावर (वय २८ रा.सोलापूर ता.संकेश्वर जिल्हा बेळगाव (कर्नाटक) याच्या विरोधात पनवेल (वाशिम)शहर पोलिस ठाण्यात जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला होता. 

त्या अनुषंगाने मोबाइल लोकेशनवर आरोपीचा शोध घेतला असता तो हुपरी परिसरात आढळून आला असता सापळा रचून अटक केली. सखोल तपासातून सोने हुपरी शहरात विक्री झाल्याचे दिसून आले यातून सहा लोकांना पोलिस ठाण्यात बोलावून चौकशी केली. यातून हा सोने विक्रीचा मामला उघडकीस आल्याचे पोलिस निरीक्षक आर. बी. घेवडेकर यांनी सांगितले आहे.

Web Title: Panvel police arrested a fraudster who fled with 35 tolas of gold along with cash in Hupri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.