पंचायत समिती सदस्याचे अर्धनग्न अवस्थेत आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 16:36 IST2020-12-11T16:29:39+5:302020-12-11T16:36:13+5:30
zp, kolhapurnews हातकणंगले तालुक्यात शौचालय अनुदानात घोटाळा झाल्याची तक्रार करूनही चौकशी होत नसल्याने स्वाभिमानीचे पंचायत समिती सदस्य प्रविण जनगोंडा आणि यांनी अर्धनग्न अवस्थेत जिल्हा परिषदेत आंदोलन केले. यावेळी त्यांची पोलिसांशी झटापटही झाली. अखेर २१ डिसेंबर २० पर्यंत चौकशी पूर्ण करण्याची ग्वाही देण्यात आली.

पंचायत समिती सदस्याचे अर्धनग्न अवस्थेत आंदोलन
कोल्हापूर- हातकणंगले तालुक्यात शौचालय अनुदानात घोटाळा झाल्याची तक्रार करूनही चौकशी होत नसल्याने स्वाभिमानीचे पंचायत समिती सदस्य प्रविण जनगोंडा आणि यांनी अर्धनग्न अवस्थेत जिल्हा परिषदेत आंदोलन केले. यावेळी त्यांची पोलिसांशी झटापटही झाली. अखेर २१ डिसेंबर २० पर्यंत चौकशी पूर्ण करण्याची ग्वाही देण्यात आली.
जनगोंडा यांनी याबाबत याआधीच पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेला निवेदन दिले होते. या तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी या योजनेमध्ये भ्रष्टाचार केल्याचा त्यांचा आरोप आहे. या सर्व प्रकाराची चौकशी करण्याची त्यांनी मागणी केली होती.
त्यांच्या तक्रारीची दखल घेवून हातकणंगले गटविकास अधिकाऱ्यांना चौकशी करण्यास सांगण्यात आले होते. परंतू त्यांच्यावरच आरोप असल्याने त्यांनी चौकशीस नकार दिला. अखेर शिरोळच्या गटविकास अधिकाऱ्यांना चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले.