दारूसाठी पैसे दिले नाहीत म्हणून पेंटरला बेदम मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 11:33 IST2021-07-19T11:32:23+5:302021-07-19T11:33:55+5:30

Crimenews Kolhapur : दारू पिण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून एका पेंटरला बेदम मारहाण करून गंभीर जखमी करण्याचा प्रकार घडला. ओंकार धोंडी खोचरे (वय २४, रा. छत्रपती कॉलनी, मुडशिंगी, ता. करवीर) असे जखमीचे नाव आहे. ही घटना शनिवारी (दि. १७) रात्री दौलतनगरात गोखले विद्यालयानजीक घडली.

Painter beaten to death for not paying for alcohol | दारूसाठी पैसे दिले नाहीत म्हणून पेंटरला बेदम मारहाण

दारूसाठी पैसे दिले नाहीत म्हणून पेंटरला बेदम मारहाण

ठळक मुद्देदारूसाठी पैसे दिले नाहीत म्हणून पेंटरला बेदम मारहाणदौलतनगरातील घटना : तरुणावर गुन्हा

कोल्हापूर : दारू पिण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून एका पेंटरला बेदम मारहाण करून गंभीर जखमी करण्याचा प्रकार घडला. ओंकार धोंडी खोचरे (वय २४, रा. छत्रपती कॉलनी, मुडशिंगी, ता. करवीर) असे जखमीचे नाव आहे. ही घटना शनिवारी (दि. १७) रात्री दौलतनगरात गोखले विद्यालयानजीक घडली.

ओंकार खोचरे हे पेंटिंग काम करतात. रोज सकाळी दौलतनगर येथे एकत्र येऊन तेथून सर्व सहकारी एकोप्याने कामावर जात होते. शनिवारी सायंकाळी खोचरे हे कामावरून परतले. त्यानंतर ते मित्र सिद्धार्थ शेळके याच्यासह पायी शाहूनगरातील कामावर जात होते. त्यावेळी माउली पुतळा परिसरात त्याला संशयित सचिन संजय कोल्हे (२२, रा. दौलतनगर) याने अडवून दारू पिण्यासाठी पैसे मागितले. त्याने नकार देताच कोल्हे याने त्याच्या कानशिलात लगावली.

हातातील कडे त्याच्या डोक्यात मारून लाथाबुक्क्यांनीही बेदम मारहाण केली. हल्ल्यात खोचरे गंभीर जखमी झाले. सिद्धार्थ शेळके व अनिकेत मांगले या दोघांनी खोचरे याची त्याच्या तावडीतून सुटका केली. त्याला जखमी अवस्थेत सेवा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. याबाबत राजारामपुरी पोलीस ठाण्यात सचिन कोल्हे याच्यावर गुन्हा नोंद झाला आहे.

Web Title: Painter beaten to death for not paying for alcohol