गेले १५ दिवस जिल्हा परिषदेच्या सत्तासंघर्षाने वेग घेतला आहे. सुरुवातीला आमदार हसन मुश्रीफ आणि आमदार पी. एन. पाटील यांनी जिल्हा बॅँकेत कॉँग्रेस, राष्ट्रवादीच्या सदस्यांची बैठक घेतली आणि जिल्हा परिषदेत सत्तांतर घडविण्याचा निर्धार व्यक्त केला. ...
समीर देशपांडे । कोल्हापूर : जिल्ह्यातील १२ पंचायत समित्यांच्या सभापतिपदाच्या निवडी ३० डिसेंबरला होत असल्याने तालुकास्तरावरील रााजकारण तापले आहे. ... ...
गुरुवारी सकाळी ८.0४ ते १0.५९ या कालावधीत सर्वांना कंकणाकृती सूर्यग्रहण पाहण्याची अतिशय दुर्मीळ संधी मिळणार आहे. मूलत: कंकणाकृती असणारे हे ग्रहण काही परिसरात मात्र खंडग्रास प्रकारचे दिसणार आहे. याचा सर्वोच्चबिंदू साडेनऊ वाजता असणार आहे. ...
महापालिकेकडून दिल्या जाणाऱ्या बायोमेट्रिक कार्डाकरिता फेरीवाल्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याची बाब मंगळवारी महापालिका आयुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीत समोर आली. त्यामुळे अशी बायोमेट्रिक कार्डे देण्याकरिता दि. १० जानेवारी २०२० पर्यंत अंतिम मु ...
कोल्हापूर शहरातील विद्यार्थी वाहतूक व्यवस्था यांची भिस्त रिक्षावर आहे. अनेक वर्षांपासून रिक्षाची नियोजनपूर्व व्यवस्था व शिस्त यांमुळे पालक निश्ंिचत आहेत. त्यामुळे विद्यार्थी वाहतूक रिक्षावरील कारवाई थांबवावी, या मागणीचे निवेदन जिल्हा वाहनधारक महासंघा ...
सदृढ आरोग्यासाठी धावा अशी साद देत कोल्हापुरात दि. ५ जानेवारी २०२० रोजी ‘लोकमत महामॅरेथॉन’चे तिसरे पर्व होत आहे. त्यात सहभागी होण्याकरिता नावनोंदणी करण्यासाठी दिवसागणिक प्रतिसाद वाढत आहे. नोंदणी करण्यासाठी दोन दिवसांची मुदत उरली आहे. ...
‘लोकमत’ने कोल्हापुरातील वाचकांसाठी धमाकेदार आॅफर सुरूकेली आहे. त्याला उदंड प्रतिसाद मिळत असून, नोंदणीसाठी वाचकांची ‘लोकमत’ कार्यालयासह भेटवस्तू वाटप केंद्रावर गर्दी होत आहे. या केंद्रावर दिवसभर वाचकांची गर्दी राहिली. या वाचक वर्गणीदार योजनेत वाचकाने ...