सकाळीच होणार संध्याकाळ, कंकणाकृती सूर्यग्रहणाची संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2019 06:11 PM2019-12-24T18:11:52+5:302019-12-24T18:15:46+5:30

गुरुवारी सकाळी ८.0४ ते १0.५९ या कालावधीत सर्वांना कंकणाकृती सूर्यग्रहण पाहण्याची अतिशय दुर्मीळ संधी मिळणार आहे. मूलत: कंकणाकृती असणारे हे ग्रहण काही परिसरात मात्र खंडग्रास प्रकारचे दिसणार आहे. याचा सर्वोच्चबिंदू साडेनऊ वाजता असणार आहे.

Evening will be in the morning, the opportunity for a solar eclipse | सकाळीच होणार संध्याकाळ, कंकणाकृती सूर्यग्रहणाची संधी

सकाळीच होणार संध्याकाळ, कंकणाकृती सूर्यग्रहणाची संधी

Next
ठळक मुद्देसकाळीच होणार संध्याकाळकंकणाकृती सूर्यग्रहणाची संधी

गुरुवारी सकाळी ८.0४ ते १0.५९ या कालावधीत सर्वांना कंकणाकृती सूर्यग्रहण पाहण्याची अतिशय दुर्मीळ संधी मिळणार आहे. मूलत: कंकणाकृती असणारे हे ग्रहण काही परिसरात मात्र खंडग्रास प्रकारचे दिसणार आहे. याचा सर्वोच्चबिंदू साडेनऊ वाजता असणार आहे. पुढील वर्षी २०२० मध्ये होणारे सूर्यग्रहण हे पावसाळ्याच्या कालावधीत आहे. तसेच त्या पुढील ग्रहण १२ वर्षांनी म्हणजेच २०३१ मध्ये भारतातून दिसणार असल्याने या वर्षीचे ग्रहण ही एक दुर्मिळ घटना असेल.

अशी असेल ग्रहणाची सुरुवात

ग्रहणाची सुरुवात सकाळी ८.0४ मिनिटांनी होईल. चंद्राची सावली वरच्या बाजूने सूर्यावरती पडण्यास सुरुवात होईल आणि हळूहळू खाली सरकेल. सूर्य झाकला जाईल तसा तसा अंधार जाणवेल. सकाळी ९.२३ वाजता ८३.५७ टक्के सूर्यबिंब झाकले जाईल.सावली खाली सरकत असताना थोडी उजवी कडे सरकेल आणि १0.५९ वाजता ग्रहण संपेल. ९.२३ नंतर थोडा थोडा प्रकाश वाढण्यास सुरुवात होईल व १0.५९ नंतर दिवस पूर्ववत होईल. यावेळी निसर्गामध्ये झालेल्या या अनपेक्षित घटनेने पक्षी आणि प्राणी बावरले जातील. पक्ष्यांचा घरट्याकडे प्रवास सुरू होइल. जास्तीत जास्त किलबिलाट ऐकू येईल. कुत्र्यांचे ओरडणे देखील स्वाभाविक आहे.

कंकणाकृती ग्रहण केरळ, तामिळनाडू आणि कर्नाटकच्या काही भागातून पहायला मिळेल. मंगलोर, कोईम्बत्तूर, इरोडे, तिरुचिरापल्ली तसेच दक्षिण भारतातून आणि सौदी अरेबिया, ओमान, श्रीलंका व इंडोनेशियामध्ये इत्यादी ठिकाणावरून दिसणार आहे. यानंतर १0 जानेवारी रोजी खंडग्रास चंद्रग्रहण तर २१ जून २0२१ रोजी खंडग्रास सूर्यग्रहण पाहायला मिळणार आहे.

ग्रहणामगाचे विज्ञान

ग्रहणामगाचे विज्ञान खूपच सोपे आहे. चंद्र पृथ्वीभोवती फिरत असताना जेंव्हा सूर्याच्या आणि पृथ्वीच्या मध्ये येतो तेंव्हा चंद्राची सावली पृथ्वीवर पडते. ज्या भागावर ही सावली पडलेली असते तिथून सूर्य दिसू शकत नाही किंवा झाकल्या सारखा दिसतो आणि त्यालाच आपण ग्रहण म्हणतो. अशी अवस्था दर अमावस्येला असते मात्र दर अमावस्येला सूर्यग्रहण होत नाही. चंद्र पृथ्वीभोवती लंबवतुर्ळाकार मागार्ने फिरतो त्यामुळे तो कधी जवळ तर कधी लांब असतो. आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे चंद्राचे प्रतल पृथ्वीच्या प्रतलाशी समांतर नसून ५ अंशाचा कोन करते.

चंद्राची पृथ्वीभोवती एक फेरी पूर्ण होईपर्यंत दोनच वेळा तो पृथ्वीच्या प्रतलाशी समांतर असतो आणि नेमका अमावस्येच्या किंवा पोर्णिमेच्या वेळी तो त्या दोनपैकी एका ठिकाणी असेल तरच ग्रहण होते. त्यामुळे अशी स्थिती फार कमी वेळा जुळून येते. जर चंद्र पृथ्वीचे प्रतल समांतर असते तर प्रत्येक पौर्णिमेला चंद्रग्रहण तर प्रत्येक अमावस्येला सूर्यग्रहण असते, मात्र तसे नाही.
ग्रहण हा फक्त सावल्यांचा खेळ आहे.

पृथ्वीची असो व चंद्राची, प्रत्येकाची सावली नेहमी आकाशामध्ये कुठे न कुठे पडलेली असते. जेंव्हा ती पृथ्वीवर पडते तेंव्हा आपण त्याला ग्रहण म्हणतो इतकाच काय तो फरक. इतर दिवशी जी हानिकारक किरणे सूयार्पासून निघतात तीच ग्रहणाच्या वेळी देखील निघत असतात. तेंव्हा घाबरून जाण्याची काहीच आवश्यकता नाही. ग्रहण ही एक शुद्ध अवकाशीय घटना आहे आणि सर्वांनी त्याचा मनमुरादपणे आनंद घेतला पाहिजे. फक्त काळजी इतकीच घ्यायची की उघड्या डोळ्यांनी हे ग्रहण न पाहता सौर चष्म्यातून किंवा फिल्टर मधून पाहिले पाहिजे.

एका प्लास्टीक बॉल ला आरशाचा चोकोणी तुकडा चिकटवून त्याचे परावर्तन भिंतीवर पाडुन आपण ग्रहण पाहू शकतो. एखाद्या कागदी पुट्याला छोटस गोल छिद्र पाडून डोक्याच्या उंचीवर धरले असता छिद्रातून जमिनीवर पडणारा प्रकाश सूर्यग्रहण दाखवेल. घराच्या कौलातून किंवा पत्र्याच्या छिद्रातून जमिनीवर प्रकाशाचा जो कवडसा पडतो तो देखील सूर्यग्रहण दाखवेल. अश्या अनेक प्रकारे आपण सुरक्षितपणे सूर्यग्रहणाचा आनंद घेऊ शकतो.
 

- प्रा. डॉ. अविराज जत्राटकर
श्री यशवंतराव पाटील सायन्स कॉलेज, सोळांकूर

 

Web Title: Evening will be in the morning, the opportunity for a solar eclipse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.