शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: युद्धविरामावरूनच वाक्-युद्ध! अमेरिकेच्या अटी इराणला अमान्य
3
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
4
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
5
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
6
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
7
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
8
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
9
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
10
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
11
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
12
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
13
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
14
"हजारोंसे भारी... एक नारी!" रोहित पवारांकडून 'त्या' रणरागिणीचं कौतुक; पोलिसांच्या कारवाईवरून सरकारला ठणकावलं
15
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
16
BEST: ‘बेस्ट’कडून ५०० मिडी बसची खरेदी, समितीची मंजुरी; सरकारकडे प्रस्ताव
17
"त्या जागेने माझं सर्वस्व हिरावलं, योगींची भेट..."; दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची व्यथा
18
महिनाभरातच नेपाळमधील बालेन शाह सरकारविरोधात जनआक्रोष, ‘या’ दोन मुद्द्यांवरून नाराजी
19
Leopard Attack: कसारा-कळभोंडेत बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
20
मन रानात गेलं गं! अश्विनी भावे यांचा शेतात मनसोक्त फेरफटका; सोशल मीडियावर दाखवली झलक
Daily Top 2Weekly Top 5

‘पीएसीएल’चे दहा हजार गुंतवणूकदार हवालदिल

By admin | Updated: August 25, 2014 00:20 IST

जिल्ह्यातील स्थिती; दूरध्वनी, प्रत्यक्ष भेटून विचारणा

कोल्हापूर : पीएसीएल लिमिटेड (पल्स) राबवत असलेली कलेक्टिव्ह इन्व्हेस्टमेंट स्कीम (सीआयएस) ताबडतोब बंद करावी. तसेच तब्बल ४९ हजार १०० कोटी रुपये गुंतवणूकदारांना तीन महिन्यांत परत देण्याचे आदेश सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड आॅफ इंडियाने (सेबी) ‘पीएसीएल’ला दिले आहेत. ते समजताच कोल्हापुरातील ‘पीएसीएल’चे सुमारे दहा हजार गुंतवणूकदार हवालदिल झाले आहेत. त्यातील काही जणांनी आज, रविवारी कंपनी कार्यालयात दूरध्वनीवरून, प्रत्यक्ष भेटून याबाबत विचारणा केली.गेल्या २१ वर्षांपासून कोल्हापुरात पीएसीएल कार्यरत आहे. या ठिकाणी कंपनीच्या विविध योजनांमध्ये सुमारे दहा हजार जणांनी लाखो रुपयांची गुंतवणूक केली आहे. त्यासह फिल्ड असोसिएट आणि एजंट म्हणून येथील अनेकजण या कंपनीत कार्यरत आहेत. ‘सेबी’च्या आदेशाची माहिती वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्यांद्वारे समजताच कोल्हापुरातील ‘पीएसीएल’चे गुंतवणूकदार हवालदिल झाले. त्यातील काहीजणांनी त्यांच्याशी संबंधित असलेले कंपनीचे फिल्ड असोसिएट, एजंटांची घरे गाठली. काहींनी कोल्हापुरातील स्टेशन रोडवरील कंपनीच्या कार्यालयात प्रत्यक्ष भेटून माहिती घेतली.पैसा बुडविणार नाहीलोकमत’ने ‘पीएसीएल’चे कोल्हापूर शाखेचे व्यवस्थापक अमित शर्मा यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, कोल्हापुरात १९९६ पासून कंपनी कार्यरत आहे. सुरुवातीला गुंतवणूक केलेल्यांचे पैसे त्यांना मिळणाऱ्या लाभासहीत परत केले आहेत. उर्वरित गुंतवणूकदारांना देखील पैसे दिले जातील. कोणत्याही गुंतवणूकदाराचा एकही पैसा बुडविणार नाही. कंपनी आणि ‘सेबी’ यांच्यात १९९९ पासून न्यायालयीन लढा सुरू आहे. जयपूर (राजस्थान)मधील न्यायालयातील लढा कंपनीने जिंकला. त्यावर ‘सेबी’ सर्वोच्च न्यायालयात गेली. ‘सेबी’ने दिलेल्या या आदेशामुळे कंपनीचे फिल्ड असोसिएट आणि एजंटांची फळी मात्र विस्कळीत होणार आहे.