शहरं
Join us  
Trending Stories
1
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
2
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
3
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
4
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
5
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
6
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
7
Video - नियतीचा खेळ! वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेली बहीण, ५ वर्षांपूर्वी हरवलेला भाऊ 'भिकारी' म्हणून आला समोर
8
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
9
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
10
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
11
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
12
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
13
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
14
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
15
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
16
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
17
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
18
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
19
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
20
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
Daily Top 2Weekly Top 5

पाचाकटेवाडीकरांना पाण्यासाठी डोंगरातील झऱ्याचाच आधार

By admin | Updated: June 3, 2015 01:00 IST

पाणीप्रश्न गंभीर : गावगाडा चालविणाऱ्याचा मात्र ग्रामस्थांना पाणीप्रश्न मिटविण्यासाठी भूलथापा; एक घागर पाणी चार रुपयाला

प्रकाश पाटील -कोपार्डे --जिल्ह्याच्या पश्चिमेला असणाऱ्या १२ वाड्यांपैकी एक पाचाकटेवाडीमध्ये पाणीप्रश्न गंभीर बनला असून, पाण्यासाठी रोजगार सोडून महिलांना पायपीट करावी लागत आहे. डोंगरावरील झऱ्याचे पाणी न मिळाल्यास घागरीला चार रुपये मोजून पाणी विकत घ्यावे लागत आहे. समृद्ध असणाऱ्या जिल्ह्यात ही शोकांतिका म्हणावी लागेल. पासार्डेपैकी पाचाकटेवाडी (ता. करवीर) सुमारे १५०० लोकवस्तीचे डोंगरीवाडी. येथील ग्रामस्थांना पाण्यासाठी डोंगरातील पाण्याच्या झऱ्याचा आधार घ्यावा लागत आहे. स्वातंत्र्याची पहाट होऊन अर्धशतक झाले तरी पाणीप्रश्न सोडविण्यासाठी ना लोकप्रतिनिधी, ना प्रशासनाला स्वारस्य असल्याचे दिसत आहे. गेल्यावर्षी २२ लाखांची नवीन पेयजल योजना मंजूर झाली. मुख्य पाईपलाईनचे काम झाले. ज्या झऱ्याला पाणी चांगल्या प्रमाणात आहे तेथे चेंबर बांधला गेलेलाच नाही. ज्या ठिकाणी चेंबर बांधला आहे व सायफन पद्धतीला पाईप टाकली आहे ती चुकीच्या ठिकाणी असल्याच्या ग्रामस्थांनी तक्रारी मांडल्या. जुन्या नळयोजनेतून पाण्याच्या टाकीत काही प्रमाणात पाणी साठते. हे पाणी चार दिवसांतून येते. तेही पूर्ण क्षमतेने मिळत नाही. केवळ चार घागरी पाण्यावर चार दिवस एकेका कुटुंबाला तहान भागवावी लागत आहे. शेतीची कामे व रोजगार बाजूला ठेवून पुरुष मंडळी, तर स्त्रियांना घरकामापेक्षा पाण्याला महत्त्व द्यावे लागत आहे. डोंगर उतारावरून चार कि. मी. खाली पासार्डेतील शेतकरी रणधीर मोरे यांच्या विहिरीवर पाणी भरण्यासाठी ग्रामस्थ व महिला येतात. जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर असताना नागरिक २५० रुपये देऊन एक हजार लिटर पाणी आरडेवाडी व पासार्डेतून विकत आणत आहेत. नवीन नळपाणी योजना त्वरित पूर्ण करून पाणीप्रश्न मार्गी लावावा, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.पाणीप्रश्न गंभीर बनल्याने जिल्हा परिषदेचे माजी सदस्य पुंडलिक पाटील, सुनील पाटील यांनी पाणीप्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले. मात्र, ते केवळ आश्वासनच ठरले. दरम्यान, उप ठेकेदार संभाजी पाचाकटे यांनी योजनेचे पाणी चेंबर बांधण्यासाठी थांबविले आहे. येत्या आठ दिवसांत ग्रामस्थांना पाणी देऊ, असे आश्वासन दिले आहे.दुसरीकडे चेंबरचे ठिकाण निश्चित करून पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण झाले तर योग्य होईल, अन्यथा काम लांबणीवर पडणार आहे.लोकसहभागाशिवाय विकास नाही. ग्रामस्थांनी पाणी योजनेच्या कामात लक्ष घालावे. पुन्हा पुन्हा योजना मिळत नाहीत. योग्य ठिकाणी चेंबर व्हावा यासाठी पाठपुरावा करू- राजेंद्र सूर्यवंशी, पंचायत समितीचे सदस्य