शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: महापूर नियंत्रणातील ३२०० कोटीपैकी शिरोळला किती निधी देणार?, आंदोलन अंकुश संघटनेची विचारणा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 17:58 IST

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे

कोल्हापूर : कोल्हापूर, सांगलीतील महापुराचा फटका ग्रामीण भागाला बसतो. मात्र, पूर नियंत्रणासाठी जागतिक बँकेच्या सहकार्याने केल्या जात असलेल्या प्रकल्पात ग्रामीण भागांचा, तालुक्यांचा समावेश नाही. त्यामुळे ग्रामीण भागासाठी तत्काळ बैठक घेऊन उपाययोजनांसाठी निधीची तरतूद व्हावी, ३२०० कोटीपैकी शिरोळला किती निधी देणार, अशी विचारणा करण्यासाठी अंकुश संघटनेने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी आंदोलकांची भेट घेऊन लवकरच यावर बैठक घेऊ, असे आश्वासन दिले.संघटनेचे जिल्हाध्यक्ष दीपक पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हा प्रशासनाला याबाबतचे निवेदन दिले. यात कोल्हापूर सांगलीतील महापुराचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागाला बसतो. पंचगंगा, वारणा, कृष्णा नद्यांच्या पात्रातील अतिक्रमण, पुलांचे भराव काढून नदीपात्राचे सरळीकरण, खोलीकरण करणे गरजेचे आहे. त्यामुळे पाण्याचा लवकर निचरा होऊन नुकसानीची व्याप्ती कमी होईल. मात्र, आता मंजूर झालेल्या डीपीआरमध्ये फक्त महापालिका, नगरपालिका या शहरी भागांसाठीच कामे मंजूर केले आहेत. त्यामुळे सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागासाठी तत्काळ बैठक घेऊन निधीची तरतूद करावी. अलमट्टी धरणाच्या बॅक वॉटरमध्ये येणाऱ्या महापुरासंबंधी शासनाने नेमलेल्या वडनेरे समितीचा अहवाल महाराष्ट्र शासनाने स्वीकारला का, कृष्णा पाणी वाटप लवादानुसार महाराष्ट्राच्या वाट्यास आलेले पाणी अन्यायकारक आहे, त्याचे फेरवाटप होण्यासाठी राज्याने पाठपुरावा करावा, अलमट्टीची उंची वाढवण्याविरोधात सांगली कोल्हापूरमधील जनतेने ४ हजारांवर हरकती नोंदवले आहेत, त्यावर केंद्राने राज्य शासनासोबत काही पत्रव्यवहार केला आहे का, अलमट्टीच्या उंचीसाठी कर्नाटकने केंद्र सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाकडे गॅजेट नोटिफिकेशनची मागणी केली आहे, त्याबाबत राज्याने घेतलेली भूमिका स्पष्ट करावी. सांगली, कोल्हापूर सातारा जिल्ह्यातील महापूर नियंत्रणासंबंधी स्वतंत्र बैठक लावावी, तसेच अलमट्टीमधील बॅक वॉटरसंबंधी नेमलेल्या अभ्यास समितीबरोबर सर्वपक्षीय संघर्ष समितीची बैठक घ्यावी, अशी मागणी निवेदनात केली आहे. यावेळी राकेश जगदाळे, रशीद मु्ल्ला, महादेव काळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.