Kolhapur: कासारी नदी पात्राबाहेर, बाजार भोगाव-अनुस्कुरा मार्ग बंद -video

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2025 20:06 IST2025-07-15T20:04:16+5:302025-07-15T20:06:03+5:30

अणुस्कुरा : कोल्हापूर जिल्ह्यात धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरुच आहे. धरणातील पाणीसाठ्यात वाढ होत असल्याने पाण्याचा विसर्ग सुरु ...

Out of Kasari river basin in Kolhapur, Bazar Bhogav Anuskura route closed | Kolhapur: कासारी नदी पात्राबाहेर, बाजार भोगाव-अनुस्कुरा मार्ग बंद -video

Kolhapur: कासारी नदी पात्राबाहेर, बाजार भोगाव-अनुस्कुरा मार्ग बंद -video

अणुस्कुरा : कोल्हापूर जिल्ह्यात धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरुच आहे. धरणातील पाणीसाठ्यात वाढ होत असल्याने पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. परिणामी नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. सोमवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे कासारी नदीचे पाणी पात्र बाहेर पडले. पुराचे पाणी बाजार भोगाव ते अनुस्कुरा मार्गावर आले आहे. यामुळे हा मार्ग वाहतुकीस बंद झाला आहे.

शाहूवाडी तालुक्यातील  कासारी नदी परिसरात व गेळवडे धरण क्षेत्रात अतिवृष्टी झाल्यामुळे बाजार भोगाव येथे मोडक्या वडाजवळ, कांटे ते करंजफेन दरम्यान वारणमळी, कांटे फाटा, बर्की फाटा, मौसम येथे खनीजवळ पाणी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर आल्यामुळे हा मार्ग काल दिवसभर वाहतुकीसाठी बंद होता. संततधार पाऊस सुरू असल्याने पाल ते सावर्डे दरम्यान रस्त्यावर पाणी आल्यामुळे दोन गावांचा संपर्क तुटला आहे, बर्की पुलावर पाणी आल्याने बर्की, बुरानवाडी, धनगर वाडा या गावांचा संपर्क तुटला आहे.

Web Title: Out of Kasari river basin in Kolhapur, Bazar Bhogav Anuskura route closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.