शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
5
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
6
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
7
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
8
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
9
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
10
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
11
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
12
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
13
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
14
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
15
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
16
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
17
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
18
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
19
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
20
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत सोमवारपासून गं्रथ महोत्सवाचे आयोजन

By admin | Updated: December 24, 2015 00:43 IST

नागनाथ कोत्तापल्ले उद्घाटक : तीन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन

सांगली : माध्यमिक, प्राथमिक शिक्षण परिषद व माध्यमिक शिक्षण विभागाच्या संयुक्त विद्यमाने सोमवार, दि. २८ डिसेंबरपासून सांगलीत ग्रंथ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सलग तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवाचे उद्घाटन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांच्याहस्ते होणार आहे. सोमवार, दि. २८ डिसेंबरला सकाळी ग्रंथदिंडीने महोत्सवाची सुरुवात होणार आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारीदिलीप पाटील यांच्याहस्ते दिंडीस सुरुवात होईल. यावेळी कोल्हापूर विभागाचे शिक्षण उपसंचालक मकरंद गोंधळी, निवासी उपजिल्हाधिकारी त्रिगुण कुलकर्णी उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांच्याहस्ते उद्घाटन होईल. दुपारी ‘वाचन संस्कृती आणि कविता’ या विषयावर प्रा. इंद्रजित भालेराव यांचे व्याख्यान होणार आहे. याचदिवशी ‘शालेय जीवनाचा अन्वयार्थ’ या विषयावर परिसंवाद होणार असून यात विजय गायकवाड, प्रा. जी. के. ऐनापुरे, अजिंक्य कुंभार, विजय कोगनोळे सहभागी होणार आहेत. मंगळवार, दि. २९ डिसेंबरला दुपारी ‘कौशल्य विकासातून व्यक्तिमत्त्व विकास’ या विषयावर चर्चासत्र होणार आहे. यात प्राचार्य आर. जी. कुलकर्णी, बळवंत जेऊरकर, प्राचार्य अनिल खटावकर, कृष्णकांत खामकर सहभागी होणार आहेत. दुपारी दोन वाजता ‘पाठ्यपुस्तकातील साहित्यिक आपल्या भेटीला’ या कार्यक्रमात प्रा. डॉ. राजन गवस आणि प्रवीण बांदेकर यांची मुलाखत होणार आहे. दुपारी कथाकथनाचा कार्यक्रम होणार असून यात भास्कर बंगाळे, रवी राजमाने, बापू जाधव कथा सादर करणार आहेत. बुधवार, दि. ३० डिसेंबरला ‘आई समजून घेताना’ या विषयावर संपतराव गायकवाड मनोगत व्यक्त करणार आहेत. दुपारी ‘विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत शिक्षकांची भूमिका’ या विषयावरील चर्चेत प्राचार्य विश्वास सायनाकर, प्रा. संजय ठिगळे, डॉ. सुरेश माने, गौतम शिंगे सहभागी होणार आहेत. दुपारी पुस्तक परीक्षण स्पर्धा होणार आहे. महोत्सवाचा समारोप कार्यक्रम इंद्रजित देशमुख यांच्या उपस्थितीत होणार आहे. या महोत्सवात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)मंगळवारी कविसंमेलन २९ डिसेंबरला सकाळी प्रा. सुभाष कवडे यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन होणार असून यात नारायण सुमंत, आबा पाटील, महेश कराडकर, दयासागर बन्ने आदी सहभागी होतील.