आयटी पार्क जागेच्या हस्तांतरणाचा अध्यादेश, कोल्हापूरकरांचे स्वप्न पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2026 11:41 IST2026-03-14T11:40:41+5:302026-03-14T11:41:00+5:30

कृषी विभागाला पर्यायी जागा कोणती?

Ordinance for transfer of IT Park land in Kolhapur | आयटी पार्क जागेच्या हस्तांतरणाचा अध्यादेश, कोल्हापूरकरांचे स्वप्न पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा

आयटी पार्क जागेच्या हस्तांतरणाचा अध्यादेश, कोल्हापूरकरांचे स्वप्न पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा

कोल्हापूर : कोल्हापुरातील शेंडा पार्कातील कृषी विभागाच्या ताब्यातील ३४.३६ हेक्टर जागा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला हस्तांतरित करण्याचा शासन अध्यादेश शुक्रवारी राज्य सरकारच्या महसूल विभागाने काढला आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून रेंगाळलेले आयटी पार्कचे स्वप्न पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

कोल्हापुरात आयटी पार्कसाठी राज्य सरकारने कृषी विभागाची ३४.३६ हेक्टर जागा विकसित करण्यासाठी एमआयडीसीकडे हस्तांतरित करण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी दिली होती. या मंजुरीचा अध्यादेश शुक्रवारी काढण्यात आला. ही जागा कृषी विभागाकडून महसूलकडे हस्तांतरित होईल.

या जमिनीचे कृषिक दराने बाजारमूल्यानुसार ठरलेली रक्कम एमआयडीसीकडून महसूल विभागाला देण्यात येईल. त्यानंतर ही जमीन एमआयडीसीकडे हस्तांतरित होणार आहे. एमआयडीसी ही जागा विकसित करून जमिनीच्या क्षेत्रानुसार प्लॅन तयार करून आयटी पार्कसाठी उपलब्ध करून देणार आहे.

कृषी विभागाला पर्यायी जागा कोणती?

शेंडा पार्कातील कृषी विभागाच्या जागेच्या बदल्यात त्यांना दुसरी जागा उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे. याची कार्यवाही जिल्हाधिकाऱ्यांनी करावी, असे या अध्यादेशात म्हटले आहे. याआधी सांगरुळ येथील वनविभागाच्या जागेचा पर्याय कृषी विभागाला देण्यात आला होता. मात्र, ती जागा पसंत पडली नसल्याने हस्तांतरण थांबले होते.

Web Title : कोल्हापुर आईटी पार्क भूमि हस्तांतरण अध्यादेश: सपना साकार होने का मार्ग प्रशस्त

Web Summary : महाराष्ट्र सरकार ने कोल्हापुर के आईटी पार्क के लिए एमआईडीसी को भूमि हस्तांतरित करने का अध्यादेश जारी किया। इससे लंबे समय से प्रतीक्षित परियोजना का मार्ग प्रशस्त हो गया है। राजस्व विभाग से धन प्राप्त होने के बाद एमआईडीसी भूमि विकसित करेगी और इसे आईटी पार्क के लिए उपलब्ध कराएगी।

Web Title : Kolhapur IT Park Land Transfer Ordinance: Dream Realization Path Cleared

Web Summary : The Maharashtra government has issued an ordinance transferring land to MIDC for Kolhapur's IT Park. This clears the path for the long-awaited project. MIDC will develop the land and make it available for the IT park after receiving the funds from revenue department.