शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
2
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
3
Top Marathi News Live: मुंबई: मरीन ड्राईव्हवर मोठा अपघात, बाईकने एकाला उडवलं, तिघांचा मृत्यू
4
Bank of Baroda मध्ये ₹१,१०,००० जमा करा, मिळेल ₹४५,६२६ चं फिक्स्ड रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
5
Vijay Wadettiwar: 'अमेरिकेप्रमाणेच भारतही विनाशाच्या मार्गावर', काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार असं का म्हणाले?
6
VIDEO: शाहीन आफ्रिदीच्या एका वर्षाच्या मुलाकडून बाबर आझम 'क्लीन बोल्ड'; झाला तुफान ट्रोल
7
इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा! पाकिस्तानमार्फत पाठवला 'रेड लाईन'चा संदेश; काय आहे प्लॅन?
8
IPL 2026 Points Table : प्लेऑप्सच्या शर्यतीत कोण टिकणार? KKR नं MI ला टाकलं मागे; LSG तळाला!
9
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
10
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
11
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
12
२० लाखांचे पॅकेज असूनही 'एक रुपया'ही टॅक्स भरावा लागणार नाही; हे नक्की करा
13
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
14
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
15
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
16
मराठी अभिनेता झाला जुळ्या मुलांचा बाबा! लग्नाच्या ८ वर्षांनी पाळणा हलला, नावंही ठेवली खूपच खास
17
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
18
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
19
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
20
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
Daily Top 2Weekly Top 5

बाजार समितीच्या ३७ कर्मचाऱ्यांना कामावर घेण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2019 15:31 IST

कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समिती प्रशासनाने कमी केलेल्या ३७ कर्मचाऱ्यांना सेवेत घेण्याचे आदेश कामगार न्यायालयाने दिले आहेत. २०१४ ला समितीचे प्रशासक रंजन लाखे यांनी या कर्मचाऱ्यांना उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कमी होते. तब्बल पाच वर्षांनी कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

ठळक मुद्देबाजार समितीच्या ३७ कर्मचाऱ्यांना कामावर घेण्याचे आदेशपाच वर्षांनी मिळाला दिलासा : प्रशासकांनी केले होते कमी

कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समिती प्रशासनाने कमी केलेल्या ३७ कर्मचाऱ्यांना सेवेत घेण्याचे आदेश कामगार न्यायालयाने दिले आहेत. २०१४ ला समितीचे प्रशासक रंजन लाखे यांनी या कर्मचाऱ्यांना उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कमी होते. तब्बल पाच वर्षांनी कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.समितीच्या तत्कालीन संचालक मंडळाने जंबो नोकरभरती केली होती. संचालकांसह नेत्यांनीही भरतीत सहभाग घेतल्याने तब्बल ४१ कर्मचाऱ्यांना कामावर घेतले होते; पण याविरोधात संचालक नंदकुमार वळंजू, बाजार समिती व संजय बाबगोंडा पाटील यांनी न्यायालयात आव्हान दिले होते.

न्यायालयाने संबंधितांना कामावर घेण्याचे आदेश दिले होते, त्यास समितीचे प्रशासक महेश कदम यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले. येथे समितीने केलेली कारवाई योग्य असल्याचे मत नोंदविल्याने नव्याने आलेले प्रशासक रंजन लाखे यांनी कर्मचाऱ्यांना कमी करण्याचे आदेश दिले.

या आदेशाविरोधात कर्मचाऱ्यांनी कामगार न्यायालयात पुन्हा धाव घेतली. त्यावर गेली तीन-चार वर्षे सुनावणी प्रक्रिया होऊन न्यायालयाने लाखे यांनी दिलेले आदेश रद्द ठरवित ३७ कर्मचाऱ्यांना सेवेत घेण्याचे आदेश दिले आहेत.

तब्बल पाच वर्षांनी कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. त्यानुसार शुक्रवारी काही कर्मचाऱ्यांनी हजर करून घेण्यासाठी प्रयत्न केल्याचे समजते. कर्मचाऱ्यांकडून अ‍ॅड. बी. बी. पोवार, समितीकडून अ‍ॅड. आर. एल. चव्हाण, तर वळंजू यांच्याकडून अ‍ॅड. ए. टी. उपाध्ये यांनी काम पाहिले.

 

टॅग्स :Marketबाजारkolhapurकोल्हापूर