शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

जनाधार नसलेल्या राणेंकडून प्रसिद्धीसाठीच टीका, शिवसेनेच्या अरुण दुधवडकर यांचे राणेंना प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2017 5:07 PM

कोल्हापूर : दोन वेळा विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या नारायण राणे यांना जनाधार राहिलेला नाही. त्यामुळेच केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठीच राणे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत आहेत.

ठळक मुद्देसभेला सुरेश साळोखेसुद्धा नव्हतेठाकरे विधानभवनात पाठवतातराणेंचा पक्ष म्हणजे भाजपाचे बांडगूळसिंधुदुर्गात संपलेले, कोल्हापुरात काय करणार ?

कोल्हापूर : दोन वेळा विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या नारायण राणे यांना जनाधार राहिलेला नाही. त्यामुळेच केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठीच राणे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत आहेत. त्यांनी त्यांच्या पक्षाचे काम करावे मात्र यापुढे ठाकरेंवरील टीका सहन करणार नाही, असा इशारा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी दिला आहे.शुक्रवारी कोल्हापूरच्या सभेत राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली होती. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी दुधवडकर यांनी रविवारी कोल्हापुरात पत्रकार परिषद घेतली. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे, आमदार राजेश क्षीरसागर, आमदार वैभव नाईक, दुर्गेश लिंग्रस उपस्थित होते. दुधवडकर म्हणाले, राणे यांनी तीच तीच कॅसेट वाजवण्यापेक्षा त्यांचे चरित्रच लिहून लोकांना वाटावे. १२ वर्षांपूर्वी त्यांचा आमचा संबंध संपला आहे. मातोश्रीवरील टीका यापुढे शिवसैनिक सहन करणार नाहीत. तुमच्या पक्षाची बांधणी करा, आमच्या शुभेच्छा आहेत. मात्र शिवसेना आणि ठाकरेंवर तोंडसुख घेण्याचे कारण नाही.सर्व प्रचारमोहिमा कोकणातून सुरू करणा-या राणेंना कोल्हापुरात येण्याची गरज का पडावी, असा सवाल उपस्थित करून त्यांनी विनय कोरे, महादेव जानकर यांच्या पक्षाची काय अवस्था आहे ती पाहावी, असा सल्लाही यावेळी दिला. कॉंग्रेसमध्ये असताना सोनियांचे पाय यांना सोन्याचे दिसले. आता यांना मुख्यमंत्री आदरणीय वाटायला लागलेत. आम्ही त्यांना विरोध केला नाही. त्यांना मंत्री करणार की संत्री हे त्यांनीच त्यांना ज्यांनी शब्द दिलाय त्यांना विचारावं, असा टोलाही दुधवडकर यांनी यावेळी राणे यांना लगावला.

सभेला सुरेश साळोखेसुद्धा नव्हतेकोल्हापूरच्या सभेला कोल्हापूरचे कोण होते असा प्रश्न उपस्थित करून त्यांचे जुने सहकारी सुरेश साळोखे हे देखील या सभेला नव्हते. ती कोल्हापूरचे करमणूक करणारी सभा होती. कोल्हापूरच्या सहा आमदारांचे काय ते आम्ही बघू. चंद्रकांतदादा पाटील यांनीही काही प्रयत्न केले. परंतु पुढच्या वेळी आणखी दोन आमदार वाढवून आणू असे दुधवडकर म्हणाले.

ठाकरे विधानभवनात पाठवतातउद्धव ठाकरे यांनी विधानभवन कधी पाहिले का असे नारायण विचारतात. पण ठाकरे विधानभवनात जात नाहीत तर तेथे शिवसैनिकांना पाठवतात. ही लिमिटेड कंपनी नसल्यानेच हा मिल कामगाराचा मुलगा बेस्टचा अध्यक्ष झाला. वैभव नाईक, राजेश क्षीरसागर आमदार झाले, असे दुधवडकर म्हणाले.

राणेंचा पक्ष म्हणजे भाजपाचे बांडगूळराणे यांचा पक्ष म्हणजे भाजपाचे बांडगूळ असल्याची टीका यावेळी आमदार वैभव नाईक यांनी केली. यांना शिवसेनेने घेतले नाही, कॉंग्रेसवाले कंटाळले. म्हणून मुलांच्या भवितव्यासाठी त्यांनी हा पक्ष काढलाय. यांना आमदार करायचे, मंत्री करायचे हे उद्धव ठाकरेच ठरवणार कारण यांना शब्द देणारे उद्धव ठाकरे यांचा सल्ला घेतात. यांना यांच्या मुलाच्या आमदारकीची काळजी आहे. मात्र यांच्यासोबत शिवसेना सोडणा-यांची तेवढी काळजी यांनी केली, असा सवाल आमदार नाईक यांनी यावेळी उपस्थित केला. हे आणि यांची दोन मुलं यांचा हा पक्ष म्हणजे ख-या अर्थानं प्रा. लि. कंपनी आहे.

सिंधुदुर्गात संपलेले, कोल्हापुरात काय करणार ?जे स्वत: सिंधुदुर्गात संपले आहेत ते कोल्हापुरातील शिवसेनेच्या आमदारांना काय संपवणार, असा सवाल यावेळी आमदार राजेश क्षीरसागर यांनी उपस्थित केला. केवळ राजकीय राक्षसी महत्त्वाकांक्षेने झपाटलेल्या राणे यांनी आमचे पुनर्वसन करण्याची गरज नाही. त्यांची लायकी तरी काय आहे, अशा शब्दांत क्षीरसागर यांनी राणेंवर टीका केली. विधानसभेच्या आधी होणा-या लोकसभा निवडणुकीतही शिवसेनेचा खासदार येणार असल्याचे क्षीरसागर म्हणाले.

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे Shiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरे