शहरं
Join us  
Trending Stories
1
उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला दिलासा! औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिवच
2
शरद पवारांनी दिलेला 'तो' प्रस्ताव काँग्रेसनं फेटाळला होता; संजय निरुपमांचा दावा
3
...तर नरेंद्र मोदी आणि अमित शहा महाराष्ट्र चालवणार का? संजय राऊतांचा सवाल
4
'भाजपमुळे मस्ती वाढली'; मराठी गुजराती वादावार आदित्य ठाकरेंचा संताप
5
"'केम छो वरली' म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना आता मराठी मतांसाठी..."; मनसेचा पलटवार
6
गुरु-शुक्र अस्तंगत: अडीच महिने विवाह मुहूर्त नाही? जुलैनंतर थेट नोव्हेंबरमध्ये सनई चौघडे
7
वडिलांच्या गैरहजेरीत अनेकदा नातेवाईकांनी दिला होता सनीला चोप; म्हणाला, 'रक्त येईपर्यंत मी...'
8
Smriti Irani : "पाकिस्तान आणि राहुल गांधींचा नेमका काय संबंध आहे?"; स्मृती इराणींचा खोचक सवाल
9
Sanju Samson Controversy : हे वागणं बरं नव्हं! सॅमसनचा पारा चढला पण झाली मोठी कारवाई
10
एअर इंडियाच्या पायलट, क्रू मेंबर्सच्या नोकऱ्या धोक्यात? अचानक ७८ फ्लाईट रद्द, प्रवासी खोळंबले
11
पाकिस्ताननं बांगड्या भरल्या नाहीत, इंडिया आघाडीचे नेते फारुख अब्दुल्ला यांचं विधान
12
पावसाचे थैमान! हैदराबादमध्ये घराची भिंत कोसळून 4 वर्षांच्या मुलासह 7 जणांचा मृत्यू
13
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून गौरव मोरेची Exit! म्हणाला - "मला खूप वाईट वाटतंय की..."
14
AstraZeneca जगभरातून कोरोनाची लस घेत आहे मागे; नव्या खुलासानंतर कंपनीचे मोठे पाऊल
15
२ शत्रू ग्रह अस्तंगत: ३ राशींना लाभच लाभ, ३ राशींना काहीसा संमिश्र काळ; कसा असेल प्रभाव?
16
Aadhar Housing Finance IPO: आजपासून खुला झाला Blackstone च्या कंपनीचा आयपीओ, पाहा डिटेल्स 
17
शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार?; एक मुलाखत अन् राजकीय चर्चांना उधाण
18
...अन् विलासराव देशमुखांमुळे रितेशची झाली मराठी सिनेमात एन्ट्री, अभिनेत्याने केला खुलासा
19
भाग्यवान! मतदाराचं अचानक फळफळलं नशीब; लकी ड्रॉमध्ये जिंकला हिऱ्याची अंगठी
20
‘१३ तारखेला मोदी सरकारचे तीन तेरा वाजवायचेत, तर ४ जूनला विसर्जन’, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

... तरच महाराष्ट्रालाही रणजी चषक जिंकता येईल--शंतनु सुगवेकर, माजी कर्णधार, महाराष्ट्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2019 1:10 AM

दीर्घकाळ क्रिकेटमध्ये टिकण्याकरिता जिल्हा विभाग, रणजी, इराणी करंडक हाच खरा आदर्श नमुना आहे. त्यामुळे नवोदित क्रिकेटपटूंनी खरे क्रिकेट काय आहे, हे समजून घेणे काळाची गरज आहे.

ठळक मुद्देचर्चेतील व्यक्तिशी थेट संवाद

सचिन भोसले ।सध्या आयपीएल आणि महिन्याच्या शेवटी इंग्लंडमध्ये होणाऱ्या विश्वचषक क्रिकेटचे वारे वाहू लागले आहे. यासह गेले कित्येक वर्षे महाराष्ट्र रणजी सामन्यात अपेक्षित अशी कामगिरी केलेली नाही. केदार जाधवचा अपवाद वगळता आजच्या घडीला एकाही महाराष्ट्रीयन खेळाडूची भारतीय संघात वर्णी लागलेली नाही. या पार्श्वभूमीवर एका कार्यक्रमानिमित्त कोल्हापुरात आलेले महाराष्ट्र रणजी संघाचे माजी कर्णधार शंतनु सुगवेकर यांच्याशी साधलेला थेट संवाद.राज्यातील क्रिकेटची सद्यस्थिती काय आहे ?

उत्तर : सध्या राज्यात पूर्वीसारख्या स्पर्धा होत नाहीत. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये स्थानिक क्रिकेट स्पर्धा होत नाहीत. विशेष म्हणजे रणजी संघातील संभाव्य खेळाडू निवडण्यासाठी जिल्हा निमंत्रित संघांची स्पर्धा फेबु्रवारीमध्ये होते. तर त्यातून निवडला जाणारा संघ नोव्हेंबरमध्ये राज्याचे रणजी स्पर्धेत प्रतिनिधीत्व करतो. या दरम्यानच्या कालावधीत खेळाडूचा परफॉर्मन्स कितपत टिकून राहील, याबाबत शंका असते; त्यामुळे रणजी करंडक स्पर्धेत अपेक्षित कामगिरी होत नाही.

क्रिकेटपटूंनी राष्ट्रीय संघात निवड होण्यासाठी काय केले पाहिजे ?उत्तर : सर्वांत आधी राज्यातील प्रत्येक क्रिकेटपटूंनी मनाशी ठरविले पाहिजे की, मला महाराष्ट्र संघासाठी खेळायचे आहे. त्यापुढे मला राष्ट्रीय संघासाठी खेळायचे आहे. हा अ‍ॅटिट्यूड ठेवल्यास तुम्ही यशस्वी होऊ शकता. सातत्य हीच तर क्रिकेटची खासियत आहे.महाराष्ट्र रणजी का जिंकू शकत नाही? उत्तर : विदर्भ क्रिकेट असोसिएशनने प्रशासन आणि क्रिकेट हे दोन वेगळे भाग केले आहेत. त्यांनी सलग दोन वर्षे रणजी विजेतेपद पटकाविले आहे. ही किमया करण्यासाठी त्यांनी गेली सहा ते सात वर्षे कष्ट घेतले आहेत. महाराष्ट्र संघालाही रणजी चषक स्पर्धेसाठी संघ निवडीचे स्वरूप बदलणे गरजेचे आहे.संडे स्पेशल मुलाखतसुगवेकर यांची कारकीर्दशंतनु यांनी १९८७ ते २००१ या १४ वर्षांच्या कालावधीत १९ वर्षांखालील भारतीय संघातून आॅस्ट्रेलियाविरूद्ध प्रतिनिधीत्व, तर रणजी, दुलिप करंडक, इराणी करंडक महाराष्ट्रकडून प्रतिनिधीत्व, कर्णधार पद सांभाळले. स्पर्धेत सार्क चषकमध्ये भारतीय संघाकडून बांग्लादेशविरूद्ध प्रतिनिधीत्व केले होते, तर बीसीसीआय बोर्ड अध्यक्षीय संघाचेही प्रतिनिधीत्व केले आहे. मध्यप्रदेश संघाविरोधात रणजीमध्ये नाबाद २९९ खेळी सर्वोत्कृष्ट खेळी ठरली आहे, तर प्रथमश्रेणीचे एकूण ८५ सामने खेळले आहेत. यात ६५८३ धावा ६१.१० सरासरीने केल्या आहेत. २००४ मध्ये १६, १९ व रणजी संघाच्या निवड समितीचे सदस्य म्हणूनही काम केले आहे.

टॅग्स :IPLआयपीएलMaharashtraमहाराष्ट्र