वाद मिटवणाऱ्या मध्यस्तावरच चाकूहल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 18:05 IST2021-07-21T18:02:08+5:302021-07-21T18:05:32+5:30
Crimenews Kolhapur : वाहन पार्किंगवरुन उफाळलेला वाद मिटवण्यासाठी गेलेल्या मध्यस्तावरच चाकूहल्ला केल्याने तो गंभीर जखमी झाल्याचा प्रकार न्यू शाहुपूरीत घडली. नौशाद महोमद अलीखान (वय २८, रा. शाहूपुरी) असे जखमीचे नाव आहे. याप्रकरणी राहुल गव्हाणे (रा. घरकुल अपार्टमेंट, न्यू शाहूपूरी) याच्यावर शाहुपूरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

वाद मिटवणाऱ्या मध्यस्तावरच चाकूहल्ला
कोल्हापूर : वाहन पार्किंगवरुन उफाळलेला वाद मिटवण्यासाठी गेलेल्या मध्यस्तावरच चाकूहल्ला केल्याने तो गंभीर जखमी झाल्याचा प्रकार न्यू शाहुपूरीत घडली. नौशाद महोमद अलीखान (वय २८, रा. शाहूपुरी) असे जखमीचे नाव आहे. याप्रकरणी राहुल गव्हाणे (रा. घरकुल अपार्टमेंट, न्यू शाहूपूरी) याच्यावर शाहुपूरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
याविषयी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, राहुल गव्हाणे व साक्षीदार उत्कर्ष मोहन चंदन यांच्यात अपार्टमेंटमधील वाहन पार्किंगवरुन गेले काही दिवस वाद होता. हा वाद उफाळल्याने राहुलने उत्कर्ष याला बघून घेतो, म्हणून धमकी दिली होती.
हे भांडण मिटवण्यासाठी फिर्यादी नौशाद व त्यांचा भाऊ ऐहतेशाम हे गेले होते, यावेळी संशयित आरोपी राहुलने संतप्त होऊन मध्यस्ती करणाऱ्यावर चाकूने वार केला. त्यावेळी फिर्यादी नौशाद अलीखान हे आडवे आल्याने त्यांच्या हातावर वर्मी घाव बसल्याने ते गंभीर जखमी झाले. याप्रकरणी राहुल गव्हाणे याच्यावर शाहुपूरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.