शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
4
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
5
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
6
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
7
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
8
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
9
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
10
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
11
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
12
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
13
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
14
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
15
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
16
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
17
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
18
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
19
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
20
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात लोकसंख्येच्या ३७ टक्के लोकांकडेच जनधन खाती, खात्यात किती कोटी रुपये..जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2026 18:06 IST

रूपे कार्डचेही वितरण : झीरो बॅलेन्सची सुविधा, शासकीय योजनांच्या अनुदानासाठी खाती उपयुक्त

भीमगोंडा देसाई कोल्हापूर : शहर आणि जिल्ह्याच्या एकूण लोकसंख्येच्या म्हणजे ३८ लाखांपैकी १४ लाख ९५ हजार ११६ जणांनी जनधनची खाती विविध बँकांत उघडली आहेत. लोकसंख्येच्या ३७ टक्के जणांकडे झीरो बॅलेन्स जनधनची खाती आहेत. या खात्यात तब्बल ७१३ कोटी ३५ लाख ८५ हजार ४९७ रुपये आहेत. जिल्हा अग्रणी बँकेच्या प्रशासनाकडून ही माहिती देण्यात आली.केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री जनधन योजनेतून झीरो बॅलेन्स खाती उघडली जात आहेत. त्याची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ही योजना आर्थिक समावेशनासाठी सुरू करण्यात आली आहे. योजनेमुळे सर्वसामाधान्य, गरीब बँकिंग सुविधांशी कनेक्ट झाले आहेत. योजनेंतर्गत खातेदारांना बचत खाते, डेबिट कार्ड, विमा सुरक्षा आणि आपत्कालीन कर्जाची सुविधा उपलब्ध केली आहे. यातून खाती उघडण्यात ग्रामीण भागात लोक आणि महिला आघाडीवर आहेत.

काय आहे प्रधानमंत्री जनधन योजना ?प्रधानमंत्री जन धन योजना केंद सरकारची महत्त्वपूर्ण आर्थिक समावेश योजना आहे. याअंतर्गत प्रत्येक कुटुंबासाठी शून्य शिल्लक बँक खाते उघडणे, रूपे डेबिट कार्ड, अपघाती विमा अशा सुविधा दिल्या जातात.

जिल्ह्यात ७१३ कोटींवर रक्कमग्रामीण ११ लाख २९ हजार १२१, तर शहरी ३ लाख ६५ हजार ९९५ जनधनच्या खात्यावर ७१३ कोटींवर रक्कम आहे.

महिला खातेदारांची संख्या अधिकएकूण जनधनच्या खात्यात ५ लाख ९५ हजार ८२० पुरुष, तर ८ लाख ९९ हजार २९६ खाती महिलांची आहेत. पुरुषांच्या तुलनेत महिलांची जनधनची खाती अधिक आहेत.

‘झीरो बॅलेन्स’मुळे रुपयाचाही दंड नाहीखात्यावर पुरेशा प्रमाणात पैसे नसतील, तर इतर प्रकारच्या खात्यामध्ये दंड होतो. बँकांच्या नियमाप्रमाणे कमीत कमी बॅलेन्स न ठेवलेल्या गरीब, सर्वसामान्य खातेदारांना यामुळे आर्थिक झळ बसत होती. मात्र, जनधनच्या झीरो बॅलेन्स खात्यामुळे दंडातून संबंधित खातेदारांची सुटका झाली आहे.

दहा लाख खातेदारांच्या हाती ‘रूपे कार्ड’जनधनच्या १० लाख ९३ हजार खातेदारांना रूपे कार्ड देण्यात आले आहे.

डीबीटीमुळे योजनांचा पैसा थेट खात्यातजनधनच्या खात्यामुळे शासनाच्या विविध योजनांतून मिळणारे अनुदान डीबीटीद्वारे थेट खात्यावर जमा होत आहे.

आकडे बोलतात..

  • जनधनची जिल्ह्यातील एकूण खाती :१४,९५,११६
  • ग्रामीण : ११,२९,१२१
  • शहर : ३,६५,९९५
  • पुरुष : ५,९५,८२०
  • महिला : ८,९९,२९६
  • खात्यावरील रक्कम : ७,१३,३५,८५,४९७

जिल्ह्यात एकूण १४ लाखांवर जनधनची खाती आहेत. इतके खातेदार बँकिंग व्यवहाराशी जोडले गेले आहेत. जनधनच्या खात्यामुळे यांना शासकीय योजनेतून डीबीटीद्वारे अनुदान घेणे सोपे झाले आहे. - मंगेश पवार, व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक, कोल्हापूर

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur: 37% Have Jan Dhan Accounts, Crores Deposited

Web Summary : In Kolhapur, 37% of the population holds Jan Dhan accounts, totaling ₹713.35 crore. More women than men have these zero-balance accounts, facilitating direct benefit transfers and financial inclusion for the poor.