विक्रीसाठी पोस्टाचा ‘आॅनलाईन बाजार’

By Admin | Updated: September 7, 2015 22:35 IST2015-09-07T22:35:44+5:302015-09-07T22:35:44+5:30

शेतकऱ्यांना दिलासा : तेलंगणात पथदर्शी प्रकल्प

The 'online market' of the post for sale | विक्रीसाठी पोस्टाचा ‘आॅनलाईन बाजार’

विक्रीसाठी पोस्टाचा ‘आॅनलाईन बाजार’

प्रकाश पाटील- कोपार्डे--माहिती आणि तंत्रज्ञानाने जग क्षणांत जवळ होत आहे याचा फायदाही शेतमालाच्या विक्रीसाठी शेतकऱ्याला व्हावा म्हणून पोस्ट खात्याने आॅनलाईन बाजाराच्या पथदर्शी प्रकल्पाची आखणी केली आहे. सध्या तेलंगणा व आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये राबविण्यात येणाऱ्या या प्रकल्पाच्या यशापयशाचा आढावा घेऊन संपूर्ण देशभर शेतीमालाच्या विक्रीचा आॅनलाईन बाजार निर्माण करण्यासाठी पोस्टाची योजना आहे.शेतीमालाची बाजारपेठ म्हटल्यावर लोकांची गर्दी, गोंधळ, मालाची आवक -जावक असे एकंदर चित्र दिसते; मात्र याला फाटा देत शेतीमालाची विक्री आॅनलाईन करण्यासाठी भारतीय पोस्ट खात्याने पुढाकार घेतला आहे. त्यामुळे शेतकऱ्याला मालाची विक्री घरबसल्या भारतालील कोणत्याही व्यापाऱ्यांना करणे शक्य होणार आहे. मालाची वाहतूक ही पोस्टामार्फत होणार असल्यामुळे शेतकऱ्याचा वाहतुकीचा खर्च वाचणार आहे.मोबाईलमुळे पोस्टाच्या उत्पन्नाला मोठा फटका बसत आहे. खासगी कुरिअर सेवा वाढल्याने या विभागाचे अस्तित्व धोक्यात आले आहे. अशावेळी ग्रामीण भागामध्ये सर्वाधिक जाळे व समन्वय असलेल्या पोस्ट खात्याने मरगळ झटकत नावीन्यपूर्ण उपायांचा अवलंब सुरूकेला आहे. त्यासाठी तेलंगणा व आंध्र प्रदेशमध्ये प्रायोगिक तत्त्वावर शेतीमालाची आॅनलाईन (इंटरनेटद्वारे) करण्याच पथदर्शी प्रकल्प सुरूकेला आहे.
एन.जी.आय.टी. सिस्टीम या कंपनीने खास व्यापारविषयक आॅनलाईन यंत्रणा तयार केली आहे. या व्यापारासाठी वाहतुकीच्या सोयी सुविधांच्या उभारणीसाठी खास लक्ष देण्यात आले आहे. आंध्र प्रदेशसह हैदराबाद, चेन्नई, बंगळूर यांना जोडण्यासाठी सुमारे ५०० ट्रक वापरले जाणार आहेत. या दोन राज्यांतील एकतृतियांश भागावरच लक्ष केंद्रित केले जाणार असून, यातून दहा कोटींचा महसूल पोस्ट खात्याला अपेक्षित आहे. शेतकऱ्यांना मोबाईलवरुन बाजारभाव तसेच विविध प्रकारची माहिती दिली जाते. आता विक्रीचा पर्याय मिळणार आहे.

असा चालेल हा आॅनलाईन बाजार

Web Title: The 'online market' of the post for sale