कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्यात एक हजार डॉक्टरांची भरती करणार : राजेश टोपे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2021 07:44 IST2021-07-17T07:42:45+5:302021-07-17T07:44:12+5:30

Rajesh Tope : दोन महिन्यात होणार कार्यवाही. क आणि ड गटाच्याही जागा दोन महिन्यांत भरण्यात येणार असल्याची माहिती.

One thousand doctors to be recruited in the state coronavirus third wave Rajesh Tope | कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्यात एक हजार डॉक्टरांची भरती करणार : राजेश टोपे

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्यात एक हजार डॉक्टरांची भरती करणार : राजेश टोपे

ठळक मुद्देदोन महिन्यात होणार कार्यवाही. क आणि ड गटाच्याही जागा दोन महिन्यांत भरण्यात येणार असल्याची माहिती.

कोल्हापूर : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्यात एक हजार वैद्यकीय अधिकाऱ्यांची भरती करण्यात आली असून, येत्या दोन महिन्यात आणखी एक हजार वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या जागा भरण्यात येणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर आलेल्या टोपे यांनी शुक्रवारी दुपारी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, गट ‘क’ आणि ‘ड’ च्या दहा हजार जागा भरण्यात येणार असून, ही प्रक्रियाही दोन महिन्यात संपवण्यात येईल. आशा वर्कर्सना १५०० रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तिसऱ्या लाटेच्या मुकाबल्यासाठी पावसाळी अधिवेशनामध्ये २०५ कोटी रुपयांचा निधी राज्य आपत्कालीन निधीतून मंजूर करण्यात आला आहे. १५ वर्षांपूर्वीच्या १००० रुग्णवाहिका वापरातून काढण्यात आल्या आहेत. आतापर्यंत ५०० नवीन रुग्णवाहिका देण्यात आल्या असून, उर्वरित ५०० रुग्णवाहिकांसाठी ७८ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. तिसऱ्या लाटेआधी आरोग्य सुविधा तयार करण्यासाठी झालेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये १२२२ कोटी रुपयांची मंजुरी घेण्यात आली असून, निधीची अडचण भासणार नाही.

उद्योजकांचा कोल्हापूर पॅटर्न
कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक उद्योजकांनी स्वखर्चाने लस विकत घेऊन आपल्या कामगारांना लस दिली आहे. कोल्हापूरचा हा पॅटर्न संपूर्ण महाराष्ट्राने राबवण्याची गरज यावेळी राजेश टोपे यांनी व्यक्त केली.

Web Title: One thousand doctors to be recruited in the state coronavirus third wave Rajesh Tope