पूर्ववैमनस्यातून झालेल्या मारहाणीत एकजण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:57 IST2021-02-05T06:57:21+5:302021-02-05T06:57:21+5:30

कोल्हापूर : विक्रम नगर येथे रविवारी दुपारी पूर्ववैमनस्यातून झालेल्या शस्त्र हल्ल्यात एकजण जखमी झाला आहे. या तलवार हल्ल्यात नीलेश ...

One person was injured in the premeditated beating | पूर्ववैमनस्यातून झालेल्या मारहाणीत एकजण जखमी

पूर्ववैमनस्यातून झालेल्या मारहाणीत एकजण जखमी

कोल्हापूर : विक्रम नगर येथे रविवारी दुपारी पूर्ववैमनस्यातून झालेल्या शस्त्र हल्ल्यात एकजण जखमी झाला आहे. या तलवार हल्ल्यात नीलेश राजू बुट्टे (वय ३१, रा. विक्रमनगर) हा जखमी झाला आहे. सीपीआर रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु असून, या घटनेची नोंद सीपीआर पोलीस चौकीत झाली आहे.

विजेच्या धक्क्याने पेंटर जखमी

कोल्हापूर : वारणा कोडोली (ता. पन्हाळा) येथील एका घरात रंगकाम सुरु असताना विजेचा धक्का बसल्याने अमितकुमार शामलाल (वय २०, रा. मूळ हरियाणा, सध्या रा. पुलाची शिरोली) हा जखमी झाला आहे. रविवारी दुपारी ही घटना घडली. शामलालला त्याच्या सहकाऱ्यांनी उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल केले. या घटनेची नोंद सीपीआर पोलीस चौकीत झाली आहे.

महिला भाजून जखमी

कोल्हापूर : चुलीवर पाणी तापवत असताना राॅकेल ओतल्यामुळे भडका उडाला. त्यात मंगल आनंदा बोटे (वय ३७, रा. कासारी, ता. कागल) ही महिला भाजून जखमी झाली आहे. रविवारी दुपारी ही घटना घडली. म्हैस धुण्यासाठी पाणी गरम करताना हा प्रकार घडला. मंगल यांना नातेवाईकांनी सीपीआर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. या घटनेची नोंद सीपीआर पोलीस चौकीत झाली आहे.

Web Title: One person was injured in the premeditated beating